काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद रणपिसे यांचे निधन, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी व्यक्त केल्या शोकभावना

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व विधानपरिषदेचे गटनेते आमदार शरद रणपिसे (वय ७१) यांचे निधन झाले. पुण्यातील जोशी खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्याेत मालवली. दरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही रणपिसे यांना शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

    पुणे : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व विधानपरिषदेचे गटनेते आमदार शरद रणपिसे (वय ७१) यांचे निधन झाले. पुण्यातील जोशी खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्याेत मालवली.

    दरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही रणपिसे यांना शोकभावना व्यक्त केल्या आहेत. गडकरी म्हणाले की, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार शरद रणपिसे यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. कायदा व संविधानाचे गाढे अभ्यासक असलेले शरदजी सामाजिक कार्य व समाज प्रबोधनातही नेहमीच अग्रेसर होते. ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती देवो. माझ्या संवेदना त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहेत. ॐ शांती.