बंगाली संस्कृतीवर आघात करण्याचा प्रयत्न कोणी केला तर..,शरद पवारांनी अशी दिली प्रतिक्रिया..

माळेगाव (ता. बारामती ) येथे गोविंदबाग या निवासस्थानी राज्यसभा खासदार व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पाच राज्यांमध्ये सुरू असलेल्या विधानसभेच्या रणधुमाळीबाबत मत व्यक्त केले.

    बारामती : पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बंगाली संस्कृतीवर आघात करण्याचा प्रयत्न कोणी केला तर संपूर्ण बंगाल एकसंध होतो. कोणी काही म्हणाले तरी बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली सरकार येईल, याची मला खात्री आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे.

    माळेगाव (ता. बारामती ) येथे गोविंदबाग या निवासस्थानी राज्यसभा खासदार व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पाच राज्यांमध्ये सुरू असलेल्या विधानसभेच्या रणधुमाळीबाबत मत व्यक्त केले.

    सध्या पाच राज्यामध्ये विधानसभा निवडणुका लागल्या आहेत. यापैकी केवळ आसाममध्ये भाजप सत्ता राखण्यात यशस्वी होईल. मात्र केरळ, तमिळनाडू, पश्चिम बंगाल इतर पक्षांना यश मिळेल. केरळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह डावे पक्ष एकत्र आले आहेत. तसेच तेथील सत्ता देखील डाव्यांच्या हातात आहे. आसाममध्ये भाजपचे राज्य आहे. त्यामुळे आसामध्ये इतर राजकीय पक्षांपेक्षा भाजपची स्थिती चांगली आहे. त्यामुळे भाजपला यश मिळेल. पाच राज्यांमधील निवडणुकांचे निकाल हे देशाला नवी दिशा देणारे ठरतील असेही पवार म्हणाले.