शिवसेनेने भाजपाचा विश्वासघात केला! हिंमत असेल तर एकत्रित येऊन लढा; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आव्हान

2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने भाजपाचा विश्वासघात केला. हिमंत असेल तर महाविकास आघाडी सरकारने राजीनामा द्यावा आणि तिन्ही पक्षांनी एकत्रित येऊन भाजपाविरुद्ध निवडणुक लढवावी, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पुण्यात दिले. आघाडी सरकार हे तीन चाकी रीक्षा असून, तिन्ही चाके पंक्चर झाली आहे. धुर सोडून प्रदुषण करण्याशिवाय हे सरकार काहीच करीत नसल्याची टीकादेखील त्यांनी केली(Shiv Sena betrayed BJP! If you have the courage, come together and fight; Union Home Minister Amit Shah's challenge).

  पुणे : 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने भाजपाचा विश्वासघात केला. हिमंत असेल तर महाविकास आघाडी सरकारने राजीनामा द्यावा आणि तिन्ही पक्षांनी एकत्रित येऊन भाजपाविरुद्ध निवडणुक लढवावी, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पुण्यात दिले. आघाडी सरकार हे तीन चाकी रीक्षा असून, तिन्ही चाके पंक्चर झाली आहे. धुर सोडून प्रदुषण करण्याशिवाय हे सरकार काहीच करीत नसल्याची टीकादेखील त्यांनी केली(Shiv Sena betrayed BJP! If you have the courage, come together and fight; Union Home Minister Amit Shah’s challenge).

  भाजपाचच मुख्यमंत्री, हे ठरले होते

  पुणे शहर भाजपाच्यावतीने आयोजित बुथ कार्यकर्ता मेळाव्यात शाह यांनी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकार विशेषत: शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. 2019 ची विधानसभा निवडणूक देवेंद्र फडणवीस यांच्या नेृत्वाखाली लढली जाईल आणि मुख्यमंत्री भाजपाचाच असेल, असे शिवसेनेबरोबर चर्चेत ठरले होते. शिवसेनेने सत्तेसाठी हिंदुत्व सोडले सोडले. मी खोटे बोलत असल्याचा आरोप ते माझ्यावर करीत आहे. पण त्यावेळी झालेल्या प्रचार सभेत जे फलक लागले होते, त्या फलकावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छायाचित्रे मोठी होती, तुमची छायाचित्रे छोटी होती हे लक्षात ठेवा, अशी आठवणही शाह यांनी शिवसेनेला करून दिली.

  निवडणूक प्रचारावेळी तुमच्या प्रत्येक भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख होता. परंतु तुम्हाला मुख्यमंत्री बनायचे होते, त्यामुळे तुम्ही विश्वासघात केला. राज्यात सत्ता मिळविली पण सरकार काही चालवू शकले नाही. तुमच्यात हिमत असेल तर राजीनामा द्या, राज्यात पुन्हा निवडणुका होऊ द्या. तुम्ही तिन्ही पक्ष एकत्र येऊन लढा राज्यातील जनता तुमचा हिशेब पूर्ण करेल असेही अमित शाह म्हणाले.

  डिलर, ब्रोकर आणि ट्रान्सफर

  आघाडी सरकार जनतेचे कल्याण करू शकत नाही. महाराष्ट्राने दुध उत्पादन, परकीय गुंतवणूक आदी क्षेत्रात देशाला दिशा दिली, या क्षेत्रात राज्य आघाडीवर होते. हे जुने वैभव हे सरकार मिळवून देऊ शकत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘डीबीटी’ योजना सुरू केली. ‘डायरेक्ट बेनिफिशअरी ट्रान्सफर’ अशी ही योजना आहे. आघाडी सरकारने मात्र डीबीटी योजना स्वत:साठीच राबविली आहे. डीबीटी योजनेचा अर्थ ‘डिलर, ब्रोकर आणि ट्रान्सफर’ असा घेत या सरकारचे काम चालू आहे. केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील कर कमी केले. भाजपाशासित राज्यांनीदेखील तेथील कर कमी केले. पण, आघाडी सरकारने पेट्रोल-डिझेलवरील नव्हे तर दारूवरील कर कमी केला. याचे उत्तर उद्धव ठाकरे सरकारला द्यावे लागणार आहे.

  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा काँग्रेसकडून अवमान

  तत्पूर्वी, संविधान निर्माते, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा काँग्रेसने पदोपदी अवमान केला. डॉ. आंबेडकर यांचा अवमान करण्याची एकही संधी काँग्रेसने सोडली नाही. काँग्रेसने नेहमी त्यांना विरोध केला, असे गंभीर आरोप शाह यांनी केला. रविवारी पुण्यात शाह यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे भूमिपूजन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. यावेळी शाह यांनी काँग्रेसवर टीका केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न देण्याचे काम बिगर काँग्रेसी सरकारने केले. आंबेडकर यांच्याशी संबंधीत पाच स्मृती जागांना त्यांचे स्मृती स्थळ बनवण्याचे काम बिगर काँग्रेसी सरकारांनी केले. ते जेव्हाही निवडणूक लढले तेव्हा त्यांना संसदेत येवू न देण्यासाठी काँग्रेसने प्रयत्न केले आणि आज तेच त्यांच्या नावाचा फायदा घेत असल्याचा आरोप शाह यांनी केला.