धक्कादायक! बेपत्ता तरुणीचा मृतदेह आढळला

बेपत्ता प्रतीमा मार्केटयार्ड परिसरात राहत होती. गेल्या दोन दिवसांपासून ती बेपत्ता होती. याबाबत तिच्या पालकांनी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार केली होती. यानुसार मिसिंग दाखल करण्यात आली होती. आज सकाळी या तरुणीचा मांजरी रेल्वे रुळ परिसरात मृतदेह आढळून आला. त्यामुळे एकच खळबळ उडाली.

    पुणे : बेपत्ता असलेल्या तरुणाचा रेल्वे रुळावर मृतदेह आढळून आल्याने पुण्यात खळबळ उडाली आहे. तिचा खून झाला असण्याची शक्यता तिच्या नातेवाईकानी व्यक्त केली आहे. खुनाचे कलम लावून तपास करावा, असे पत्र त्यानी पोलिसांना दिले आहे. प्रतीमा भास्कर पुटगे (वय २२) असे या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेपत्ता प्रतीमा मार्केटयार्ड परिसरात राहत होती. गेल्या दोन दिवसांपासून ती बेपत्ता होती. याबाबत तिच्या पालकांनी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार केली होती. यानुसार मिसिंग दाखल करण्यात आली होती. आज सकाळी या तरुणीचा मांजरी रेल्वे रुळ परिसरात मृतदेह आढळून आला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच हडपसर पोलिसांनी धाव घेतली. तसेच तरुणीची ओळख पटवली. त्यावेळी तरुणी मार्केटयार्ड परिसरातून बेपत्ता असल्याचे समजले. तर याबाबत मिसिंग देखील असल्याचे समजले. त्यानंतर ही माहिती मार्केटयार्ड पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. अधिक तपास मार्केटयार्ड पोलीस करत आहेत.