धक्कदायक! माहेराहून पैसे आणण्याची मागणी करत विवाहितेचा छळ

पती अकबर मेहबूब तांबोळी (वय २८), दीर ईलाही मेहबूब तांबोळी (वय २८) आणि सासू (सर्व रा. बोऱ्हाडेवाडी, मोशी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित विवाहितेने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार सप्टेंबर २०२० ते २० जून २०२१ या कालावधीत घडला.

    पिंपरी : सोफासेट, टीव्ही घेण्यासाठी तसेच घरात किचन ट्रॉली बनवून घेण्यासाठी माहेराहून पैसे आणण्याची मागणी करत विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पती, सासू आणि दीर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बोऱ्हाडेवाडी – मोशी येथे घडली.

    पती अकबर मेहबूब तांबोळी (वय २८), दीर ईलाही मेहबूब तांबोळी (वय २८) आणि सासू (सर्व रा. बोऱ्हाडेवाडी, मोशी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित विवाहितेने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार सप्टेंबर २०२० ते २० जून २०२१ या कालावधीत घडला.

    पीडित विवाहिता सासरी नांदत असताना आरोपींनी तिला घरात व्यवस्थित काम करत नाही, तसेच सोफासेट, टीव्ही माहेराहून आणण्यासाठी, घरात किचन ट्रॉली बनवून घेण्यासाठी तसेच इतर कारणांसाठी पैशांची वेळोवेळी मागणी केली. त्यावरून आरोपींनी पीडित महिलेला शिवीगाळ करून मारहाण केली. विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ केला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करत आहेत.