धक्कादायक ! विजापूर येथे ट्रक व तावेराच्या अपघातात दोन कबड्डीपटूंचा मृत्यू

महाराणा कबड्डी संघ राज्यात प्रसिध्द आहे.येथे कबड्डीसाठी अनेक विद्यार्थी येतात. या संघात अनेक राष्ट्रीय कबड्डीपट्टु घडले आहेत.अनेकजण कबड्डीच्या बळावर पोलीस भरती देखील झाले आहेत. बुधवारी झालेल्या अपघाताची माहिती समजल्यानंतर परीसरात खळबळ उडाली.कळंबमधुन तातडीने ग्रामस्थ विजापुरच्या दिशेने रवाना झाले आहेत.

    वालचंदनगर : कळंब येथील महाराणा कबड्डी संघातील खेळाडुंच्या तवेरा गाडीला विजापूर येथे पहाटे ५ च्या सुमारास अपघात झातयाचे समोर आले आहे. ट्रक आणि तवेरा गाडीची धडक होवुन झालेल्या गंभीर अपघातात सोहेल सय्यद (वय २२,,महादेव आवटे (वय २०) या दोन कबड्डीपटुंचा मृत्यू झाला आहे.तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.

    सर्व कबड्डीपट्टू मंगळवारी रात्री एका स्पर्धेसाठी हुबळीच्या दिशेने १३ जण निघाले होते.या दरम्यान, विजापुरच्या पुढे ५० किमी अंतरावर गाडीला बुधवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास ट्रक आणि तवेरा गाडीची धडक होवून अपघात झाला आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या आणि जखमी खेळाडुंची नावे अद्याप स्पष्ट समजु शकलेली नाहीत. गंभीर सर्व खेळाडूंना विजापूर येथील बंजारा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.या प्रकरणी कोल्हारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.महाराणा कबड्डी संघ राज्यात प्रसिध्द आहे.येथे कबड्डीसाठी अनेक विद्यार्थी येतात. या संघात अनेक राष्ट्रीय कबड्डीपट्टु घडले आहेत.अनेकजण कबड्डीच्या बळावर पोलीस भरती देखील झाले आहेत. बुधवारी झालेल्या अपघाताची माहिती समजल्यानंतर परीसरात खळबळ उडाली.कळंबमधुन तातडीने ग्रामस्थ विजापुरच्या दिशेने रवाना झाले आहेत.