धक्कादायक! पुण्यात भरदिवसा सार्वजनिक स्वच्छतागृहात नेवून अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार

क्रारदार अल्पवयीन मुलगा व त्याचा एक मित्र दांडेकल पुलाजवळील पीएमटी बस स्टॉपवर थांबले होते. त्यावेळी तोंडओळखीचा आरोपी सागर सोनवणे हा तेथे आला. त्याने मुलाला फरफटत ओढत येथे असलेल्या सार्वजनिक स्वच्छता गृहात नेले. त्याठिकाणी त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार करून बलात्कार केला. हा मुलगा या घटनेने घाबरला होता.

    पुणे : दांडेकल पुलाजवळील पीएमटी बस स्टॉपजवळ थांबलेल्या एका अल्पवयीन मुलाला फरफटत ओढत सार्वजनिक स्वच्छतागृहात नेहून त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शुक्रवारी भरदुपारी हा प्रकार घडला आहे.याप्रकरणी सागर पोपट सोनवणे (वय २१, रा. दांडेकर पुल) याला अटक केली आहे. याबाबत १६ वर्षीय मुलाने दत्तवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

    पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार अल्पवयीन मुलगा व त्याचा एक मित्र दांडेकल पुलाजवळील पीएमटी बस स्टॉपवर थांबले होते. त्यावेळी तोंडओळखीचा आरोपी सागर सोनवणे हा तेथे आला. त्याने मुलाला फरफटत ओढत येथे असलेल्या सार्वजनिक स्वच्छता गृहात नेले. त्याठिकाणी त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार करून बलात्कार केला. हा मुलगा या घटनेने घाबरला होता. त्याने पोलीसांकडे धाव घेऊन याची माहिती दिली. पोलीसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत सागर याला अटक केली आहे. त्याच्याकडे चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. अधिक तपास दत्तवाडी पोलीस करत आहेत.