प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

तक्रारदार या वानवडी पोलीस ठाण्यात कर्तव्यास आहेत. त्या बुधवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास मोलेदिना रस्त्यावरील महेश लंच समोर असलेल्या सिग्नलला थांबल्या होत्या. त्याचवेळी मकसूद हा भरधाव दुचाकीवर पाठीमागून आला. त्याने सिग्नल तोडला व जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याचा धक्का तक्रारदार यांना लागला.

    पुणे : सिग्नल लागल्याने थांबल्यानंतर पाठीमागून भरधाव दुचाकीवर येत सिग्नल तोडून निघालेल्या तरूणाला जाब विचारणाऱ्या महिला पोलिसाचा दुचाकीस्वाराने रस्त्यात शिवीगाळ व अश्लील हावभाव करत विनयभंगाचा प्रयत्न केला असल्याची घटना घडली आहे. मोलेदिना रस्त्यावर बुधवारी दुपारी हा प्रकार घडला आहे. पोलिसांनी तरुणाला अटक केली.

    मकसूद बाबु शेख (वय ३२, इक्बाल मजिद समोर कोंढवा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी ४२ वर्षीय महिला पोलीस कर्मचाऱ्याने बंडगार्डन पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार या वानवडी पोलीस ठाण्यात कर्तव्यास आहेत. त्या बुधवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास मोलेदिना रस्त्यावरील महेश लंच समोर असलेल्या सिग्नलला थांबल्या होत्या. त्याचवेळी मकसूद हा भरधाव दुचाकीवर पाठीमागून आला. त्याने सिग्नल तोडला व जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याचा धक्का तक्रारदार यांना लागला. धक्का लागल्याने त्यांनी याबाबत जाब विचारला असता त्याने दुचाकी बाजूला घेऊन “तू मला विचारणार कोण” असे म्हणत वाद घातला. तर त्याने शिवीगाळ करत अश्लील हावभाव करून त्यांच्या मनात लज्जा उत्पन्न केली. तसेच त्यांना मारण्यासाठी अंगावर धावून गेला. अधिक तपास बंडगार्डन पोलीस करत आहेत.