पुण्यात शनिवारी आणि रविवारी दुकानं बंद राहणार; अजित पवारांची मोठी घोषणा

महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्या कमी होत असली तरी रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, बीड, उस्मानाबाद, कोल्हापूर तर काही प्रमाणात पुण्यातही कोरोना रुग्णसंख्या कमी होत नाही. शनिवार, रविवार महाबळेश्वर, खंडाळा, लोणावळा, खोपोलीत नागरिकांची प्रचंड प्रमाणात गर्दी असते. परंतु नागरिकांना कोरोनाची स्थिती गांभीर्याने घेण्याची गरज आहे. राज्याबाहेर जाणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. असं अजित पवार म्हणाले.

    पुण्यात कोरोनाचे संकट हळूहळू कमी होत आहे. परंतु अत्यावश्यक सेवा वगळता पुण्यात  शनिवार आणि रविवार दुकानं बंद राहणार असल्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केली आहे. यावेळी अजित पवार यांनी निर्बंध अजून कठोर करण्याचा इशारा देताना विनाकारण जिल्ह्याबाहेर जाणाऱ्या पुणेकरांना १५ दिवसांसाठी क्वारंटाइन केलं जाईल असं सांगितलं आहे. तसंच पर्यटनस्थळी गर्दी न करण्याचं आवाहन केलं आहे.

    महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्या कमी होत असली तरी रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, बीड, उस्मानाबाद, कोल्हापूर तर काही प्रमाणात पुण्यातही कोरोना रुग्णसंख्या कमी होत नाही. शनिवार, रविवार महाबळेश्वर, खंडाळा, लोणावळा, खोपोलीत नागरिकांची प्रचंड प्रमाणात गर्दी असते. परंतु नागरिकांना कोरोनाची स्थिती गांभीर्याने घेण्याची गरज आहे. राज्याबाहेर जाणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. असं अजित पवार म्हणाले.

    टास्क फोर्सच्या डॉक्टरांनी अमेरिका, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका या तिन्ही ठिकाणी तिसरी लाट येऊ पाहत असल्याचं सांगितलं आहे. खासकरुन अमेरिका आणि इंग्लंड येथे मोठ्या प्रमाणात लसीसकरण होऊनही अशी परिस्थिती झाली आहे. नीट काळजी घेतली नाही आणि जीव गमावला तर कुटुंब उघड्यावर पडतं. ही गोष्ट होता कामा नये, असं आवाहन अजित पवार यांनी यावेळी केलं आहे.