महावितरणकडील तुटवडा संपेना : खासगी विक्रेत्यांची चांदी वीज मीटरची खुल्या बाजारात चढ्या दराने विक्री

ज्या ग्राहकांना तातडीने मीटर पाहिजे असेल आणि महावितरणकडे नेहमीप्रमाणे मीटर उपलब्ध नसल्यास, त्यांनी खुल्या बाजारातून मीटर विकत घेण्याची मुभा देण्यात आली आहे .नेमक्या याच बाबीतून आता ग्राहकांची लूट सुरु झाली आहे. सातशे रुपये किंमतीचा सिंगल पेज मीटर दोन हजार रुपयांना ,अडीच ते तीन हजार रुपये किंमतीचा थ्री फेज मीटर सात ते आठ हजारांना बाजारात विकला जात आहे.

    पिंपरी: गेल्या अनेक दिवसांपासून महावितरणकडे वीज मीटरचा तुटवडा सुरुच असल्याने खासगी विक्रेत्यांची चांदी होत आहे. दुपटीपेक्षा अधिक दराने वीज मीटरची विक्री होत असून, ग्राहककंगाल आणि वीज मीटर विक्रेते मालामाल होऊ लागले आहे. वीज मीटरचा काळा बाजार मोठ्या प्रमाणात सुरु असून, शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच असे प्रकार घडू लागल्याने ग्राहकांनी रोष व्यक्त केला आहे.

    वीज जोडणी घेण्याच्या प्रतीक्षेत सध्या महावितरणकडे असलेल्या वीज मीटरच्या तुटवड्याने चांगलाच गोंधळ होत आहे. सर्व प्रक्रियेत ग्राहक भरडला जात असून वीज मीटरपर्यंत सर्व पायाभूत सुविधा वीज वंâपनीने उभारावी, या विद्युत कायदा नियमाला महावितरणकडून हरताळा फासला जात आहे.एकीकडे महावितरणचे वरिष्ठ अधिकारी तुटवडा असल्याचे मान्य करण्यात तयार नाहीत, परंतु दुसरीकडे तुटवडा असल्याने खुल्या बाजारातुन मीटर घेण्याची परवानगी देण्यात आली आहे.यामुळे ग्राहकांना वेठीस धरुन खासगी व्यायसायिक भरपूर नफा कमावित आहेत.

    महावितरणची अवस्था दिवसेंदिवस बिकट होऊ लागली असून, वीज ग्राहकांना सुविधा देण्यात येते असलेले अपयश तसेच वीज वंâपनीचा आर्थिंक डोलारा डळमळीत होत असल्याची चर्चा आहे.तसेच ही महावितरणच्या खासगीकरणाचे वारे वाहू लागले असल्याची नांदी असल्याची चर्चा आहे.ज्या वीज मीटरवर वीज वंâपनीचा महसूल आहे आणि जो मीटर वंâपनीच्या अस्तित्वाचा कणा आहे,तोच द्यायला वीज कंपनी हतबल असल्याने सामान्य वीज ग्राहकांना  वाईट अनुभवांना सामोरे जावे लागत आहे.

    वीज कंपनीने मीटर नस्ल्याने बाजारातून मीटर खरेदी करुन त्याची चाचणी घेण्याचे आदेश काही महिन्यांपूर्वी काढले होते. ज्या ग्राहकांना तातडीने मीटर पाहिजे असेल आणि महावितरणकडे नेहमीप्रमाणे मीटर उपलब्ध नसल्यास, त्यांनी खुल्या बाजारातून मीटर विकत घेण्याची मुभा देण्यात आली आहे.नेमक्या याच बाबीतून आता ग्राहकांची लूट सुरु झाली आहे.सातशे रुपये किंमतीचा सिंगल पेज मीटर दोन हजार रुपयांना ,अडीच ते तीन हजार रुपये किंमतीचा थ्री फेज मीटर सात ते आठ हजारांना बाजारात विकला जात आहे.महावितरणने त्यांच्या चाचणीत उत्तीर्ण असलेल्या वीज मीटर कंपन्यांची यादी जाहीर केली आहे.बाजारात मात्र त्या मीटरचा कंपन्यांची वाणवा आहे.त्यामुळे मीटर विक्रीत काळाबाजार होत असून, ग्राहकांना मनस्ताप आणि आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.