Blood Dot Lives free initiative to collect blood through moblie app

पुण्यात गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून त्यामुळे रक्ताचा पुरवठा कमी होत चालल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागातील सूत्रांनी दिलीय. गेल्या काही दिवसांत अचानकपणे कोरोना रुग्ण दाखल होण्याचं प्रमाण वाढलंय. त्यामुळं रक्ताचा मर्यादित साठा संपत चालल्याचं समजतंय. हा रक्तसाठा लवकरात लवकर वाढवण्याची गरज आहे. 

    कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सध्या जगभर धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. भारतात सर्वाधिक कोरोना रुग्ण हे महाराष्ट्रात असून महाराष्ट्राच्या शहरी भागात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार उडवून दिलाय. पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून वाढत्या रुग्णसंख्येचा परिणाम आता रक्ताच्या पुरवठ्यावर जाणवू लागला आहे.

    पुण्यात गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून त्यामुळे रक्ताचा पुरवठा कमी होत चालल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागातील सूत्रांनी दिलीय. गेल्या काही दिवसांत अचानकपणे कोरोना रुग्ण दाखल होण्याचं प्रमाण वाढलंय. त्यामुळं रक्ताचा मर्यादित साठा संपत चालल्याचं समजतंय. हा रक्तसाठा लवकरात लवकर वाढवण्याची गरज आहे.

    पुण्यातील रक्तपेढ्यांमधील रक्तसाठा संपत चालल्यामुळे नागरिकांनी अधिकाधिक संख्येनं रक्तदान करावं, असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलंय. नागरिकांनी रक्त देण्यासाठी पुढाकार घेतला, तर काही दिवसांतच हे चित्र बदलू शकतं आणि रक्तसाठी पूर्ववत होऊ शकतो, अशी माहिती देण्यात आलीय.

    हे सुद्धा वाचा

    गेल्या वर्षी अशीच परिस्थिती मुंबईतही ओढवली होती. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येचा परिणाम रक्तसाठ्यावर झाल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यानंतर मुख्यमत्र्यांनी नागरिकांना मोठ्या संख्येनं रक्तदान करण्याचं आवाहन केलं होतं. त्यानंतर वेगवेगळ्या परिसरात रक्तदान शिबिरांचं आयोजन करून ही कमतरता भरून काढण्यात आली होती. यावेळीदेखील अशाच प्रकारे रक्तसाठा वाढवण्याचं आव्हान प्रशासनासमोर असणार आहे.