प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

हिंदुत्वाच्या मुद्यावर शिवसेना आणि भाजपा युती पुन्हा होऊ शकते. आता शिवसेनेने हा निर्णय घ्यायचा आहे, असे रोखठोक मत भाजपाचे पुण्यातील खासदार गिरीश बापट यांनी व्यक्त केले आहे. पुणे महापालिका निवडणुकीत शिवसेनेला सोबत घेण्यासाठी आम्ही प्राधान्य देणार आहे. महापालिकेत शिवसेना भाजपा-युती होऊ शकते, पुणे महापालिका निवडणुकीसाठी आम्ही सज्ज आहोत.

    पुणे : हिंदुत्वाच्या मुद्यावर शिवसेना आणि भाजपा युती पुन्हा होऊ शकते. आता शिवसेनेने हा निर्णय घ्यायचा आहे, असे रोखठोक मत भाजपाचे पुण्यातील खासदार गिरीश बापट यांनी व्यक्त केले आहे. पुणे महापालिका निवडणुकीत शिवसेनेला सोबत घेण्यासाठी आम्ही प्राधान्य देणार आहे. महापालिकेत शिवसेना भाजपा-युती होऊ शकते, पुणे महापालिका निवडणुकीसाठी आम्ही सज्ज आहोत.

    राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा आम्ही शिवसेनेला प्राधान्य देऊ, असेही खासदार बापट म्हणाले. भाजपा-शिवसेनेची युती ही हिंदुत्वावर होती. ती पुढेही होऊ शकते. कारण हिंदुत्व हा आपला श्वास आहे. ही सर्वांच्या मनातील बोलकी प्रतिक्रिया आहे. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक सर्वांच्या मनातील बोलले आहेत.

    भविष्यात युती होऊ शकते. राजकीय जीवनात अशा गोष्टी घडत असतात. भाजपाने याआधीही सांगितले होते, तुमची आमची नैसर्गिक युती आहे. पण मधल्या काळात कृत्रिम लोकांनी ती तोडली. मात्र, भविष्यात अशी युती झाली तर भाजपच्या कार्यकर्त्यांनाही आनंद होईल, असेही बापट म्हणाले.

    हे सुद्धा वाचा