महाराष्ट्र साहित्य परिषदच्या जागेचा प्रश्न मार्गी लावा ; पदाधिकारी आणि सदस्यांची मागणी

गेल्या ३० वर्षांपासून मराठी भाषेचा प्रसार आणि प्रचारासाठी साहित्य क्षेत्रात सातत्याने कार्यरत असणाऱ्या महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी-चिंचवड शाखेला जागेसंबधी आश्वासन मिळूनही प्रत्यक्षात कृती झालेली नाही. प्रतिकूल परिस्थितीतून आयुष्य घडविणाऱ्या आयुक्तांनी पुस्तक लिहिलेले आहे.

    पिंपरी : महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवडच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त राजेश पाटील यांची भेट घेतली आणि शाखेच्या जागेसंबंधी निवेदन दिले. तसेच या जागेचा प्रश्न त्वरित निकाली काढण्याची मागणी केली.

    याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या ३० वर्षांपासून मराठी भाषेचा प्रसार आणि प्रचारासाठी साहित्य क्षेत्रात सातत्याने कार्यरत असणाऱ्या महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी-चिंचवड शाखेला जागेसंबधी आश्वासन मिळूनही प्रत्यक्षात कृती झालेली नाही. प्रतिकूल परिस्थितीतून आयुष्य घडविणाऱ्या आयुक्तांनी पुस्तक लिहिलेले आहे.

    तेव्हा लेखक या नात्याने साहित्यिक असलेल्या आयुक्तांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या जागेचा मनावर घेतल्यास लवकर सुटू शकतो आणि आयुक्त पद भूषविणारे एक साहित्यिक म्हणून ते मनावर घेतील अशी विनंती केली आहे. यावेळी झालेल्या चर्चेत महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी-चिंचवड चे अध्यक्ष राजन लाखे,सदस्य अरुण बोराडे, श्रीकांत चौगुले, किशोर पाटील आणि विनोद गायकवाड आदी उपस्थित होते. भेटीत झालेल्या चर्चेत आयुक्तांनी साहित्य परिषदेच्या उपक्रमाविषयी माहिती जाणून घेतली आणि सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.