खळबळजनक ! दगडाने ठेचून बापलेकाची हत्या

लोणीकंद भागात बाप-लेकाचा कोयता, दगड आणि बेसबॉलने ठेचून खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेने प्रचंड खळबळ उडाली आहे. माहिती मिळाल्यानंतर लोणीकंद पोलिस घटनास्थळी झाले आहेत.

    पुणे : लोणीकंद भागात बाप-लेकाचा कोयता, दगड आणि बेसबॉलने ठेचून खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेने प्रचंड खळबळ उडाली आहे. माहिती मिळाल्यानंतर लोणीकंद पोलिस घटनास्थळी झाले आहेत.

    सनी कुमार शिंदे (वय 22) आणि कुमार शिंदे (वय 55) अशी खून झालेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सूरु आहे. दरम्यान या खुनाचा अद्याप उलघडा झालेला नाही.

    सनी शिंदे हा कारागृहात होता. तीन महिन्यांपूर्वी जामिनावर सुटून तो बाहेर आला होता. खून प्रकरणात तो कारागृहात होता. दरम्यान, आज सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी सनीला गाठले आणि कोयता, बेसबॉलने मारहाण करण्यास सुरुवात केली.

    दरम्यान, कुमार शिंदे हे मुलाला वाचवण्यासाठीमध्ये गेले असता आरोपींनी त्यांच्यावर देखील हल्ला केला. हल्लेखोरांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सनी शिंदे आणि कुमार शिंदे यांचा यामध्ये मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच लोणीकंद पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यातील आरोपींची नावे निष्पन्न झाली असून पोलिस त्यांचा शोध घेत आहे.