व्यसनमुक्ती केंद्रात दाखल केल्याने मुलाने बापाचा दात पाडला

पराग पुरूषोत्तम चौकडे (वय ३५, रा. लांडगे वस्ती, भोसरी) असे अटक आरोपीचे नाव आहे. त्याचे वडील पुरूषोत्तम सिताराम चौकडे (वय ६५, रा. इंद्रायणी कॉलनी, भोसरी) यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादी पुरूषोत्तम यांनी मुलगा पराग याला व्यसनमुक्ती केंद्रात दाखल केले.

    पिंपरी :  व्यसनमुक्ती केंद्रात दाखल केल्याचा राग आल्याने ठोसा मारून मुलानेच बापाचा दात पाडला. आईला मारहाण केली. तसेच भाडेकरूंना पैशाची मागणी करत दुकाने जाळून देण्याची धमकी दिली. १६ ऑक्टोंबर ते १० डिसेंबर या कालावधीत इंद्रायणीनगर – भोसरी येथे हा प्रकार घडला

    पराग पुरूषोत्तम चौकडे (वय ३५, रा. लांडगे वस्ती, भोसरी) असे अटक आरोपीचे नाव आहे. त्याचे वडील पुरूषोत्तम सिताराम चौकडे (वय ६५, रा. इंद्रायणी कॉलनी, भोसरी) यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादी पुरूषोत्तम यांनी मुलगा पराग याला व्यसनमुक्ती केंद्रात दाखल केले. परागला याचा राग आल्याने त्याने आपल्या वडिलांच्या गालावर जोराचा ठोसा मारून त्यांचा दात पाडला. तसेच, आईने मध्यस्थी केली असता तिलाही मारहाण केली. परागने फिर्यादी पुरूषोत्तम यांचे भाडेकरूंकडे पैशाची मागणी केली व दुकाने जाळण्याची धमकी दिली. भोसरी एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.