कोरेगाव भिमा मानवंदना कार्यक्रमासाठी विशेष बससेवा

तुळापूर फाटा - लोणीकंद कुस्ती मैदान येथून ३० बसेस, वढू फाटा ते वढू करिता ५ बसेस व तोरणा हॉटेल शिक्रापूर रोड ते भिमा कोरेगांव पर्यंत २५ बसेस अशा एकूण ६० मोफत (विनातिकिट) बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच १ जानेवारी रोजी तुळापूर फाटा / लोणीकंद कुस्ती मैदान ते पेरणे टोल नाका पर्यंत १०० बसेस, शिक्रापूर रोड (तोरणा हॉटेल) ते भिमा कोरेगांव पर्यंत ७५ बसेस व वढू फाटा ते वढू पर्यंत २५ बसेस अशा एकूण २०० मोफत (विनातिकिट) बसेसचे नियोजन करण्यात आले आहे.

    पुणे : पीएमपीकडून १ जानेवारी २०२२ रोजी विजयस्तंभ कोरेगाव भिमा मानवंदना कार्यक्रमासाठी विशेष बससेवा देण्यात येणार आहे. कोरेगांव भिमा क्रांतीस्तंभ या ठिकाणी स्तंभास मानवंदना देण्यासाठी राज्यातून तसेच पुणे व पिंपरी चिंचवड शहर व ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित राहत असतात. या भाविकांच्या सोयीसाठी तसेच येणारी वाढीव प्रवासी संख्या विचारात घेवून पीएमपीने ३१ डिसेंबर २०२१ ते १ जानेवारी २०२२ या कालावधीत जादा बसेसचे नियोजन केले आहे.

    तुळापूर फाटा – लोणीकंद कुस्ती मैदान येथून ३० बसेस, वढू फाटा ते वढू करिता ५ बसेस व तोरणा हॉटेल शिक्रापूर रोड ते भिमा कोरेगांव पर्यंत २५ बसेस अशा एकूण ६० मोफत (विनातिकिट) बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच १ जानेवारी रोजी तुळापूर फाटा / लोणीकंद कुस्ती मैदान ते पेरणे टोल नाका पर्यंत १०० बसेस, शिक्रापूर रोड (तोरणा हॉटेल) ते भिमा कोरेगांव पर्यंत ७५ बसेस व वढू फाटा ते वढू पर्यंत २५ बसेस अशा एकूण २०० मोफत (विनातिकिट) बसेसचे नियोजन करण्यात आले आहे.