शौर्य दिनी घरी राहूनच अभिवादन करा; पिंपरी चिंचवड़ पोलीस व आंबेडकरी कार्यकर्त्यांचे संयुक्त आवाहन

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी कोरेगाव भिमाचा उत्सव हा केवळ प्रातिनिधिक स्वरूपात करण्यात येणार आहे. याबाबत मार्गदर्शक आदेश राज्य शासनाच्या वतीने करण्यात आले आहेत.केवळ पास धारक व्यक्तींनाच अभिवादनासाठी कोरेगाव भीमा, पेरणे फाटा या ठिकाणी जाता येणार असल्याने अन्य आंबेडकरी अनुयायांनी घरच्या घरीच अभिवादन करावे, असे आवाहन यावेळी सर्वांच्या वतीने करण्यात आले.

पिंपरी: शौर्य दिनानिमित्त कोरेगाव भीमा येथील लढ्यातील शूरवीरांना अभिवादन करण्यासाठी विजयस्तंभाच्या ठिकाणी न जाता नागरिकांनी घरच्या घरीच अभिवादन करावे. आंबेडकरी पक्ष संघटना प्रतिनिधी आणि पोलीस यांच्यात आज झालेल्या बैठकी नंतर हे आवाहन करण्यात आले. शहरातील विविध पक्षसंघटनेत कार्यरत असलेल्या आंबेडकरी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांच्यासोबत बैठक आयोजित करण्यात आली होती.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी कोरेगाव भिमाचा उत्सव हा केवळ प्रातिनिधिक स्वरूपात करण्यात येणार आहे. याबाबत मार्गदर्शक आदेश राज्य शासनाच्या वतीने करण्यात आले आहेत.केवळ पास धारक व्यक्तींनाच अभिवादनासाठी कोरेगाव भीमा, पेरणे फाटा या ठिकाणी जाता येणार असल्याने अन्य आंबेडकरी अनुयायांनी घरच्या घरीच अभिवादन करावे, असे आवाहन यावेळी सर्वांच्या वतीने करण्यात आले. नागरिकांनी प्रशासनाच्या आदेशाचे पालन करावे, कोरोनाचा नवीन प्रकार आढळला आहे. त्याचा प्रसार होऊ नये यासाठी सर्वांनी घरातूनच विजयस्तंभास मानवंदना द्यावी, असे आवाहन बाबा कांबळे यांनी केले आहे.

पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी राज्य सरकारचे निर्णय व यापूर्वी समाजातील आयोजक पक्ष संघटना व प्रशासनाच्या संयुक्त बैठकीबाबत झालेल्या निर्णयाची यावेळी माहिती दिली. यावेळी सहायक पोलीस आयुक्त नंदकुमार भोसले यांच्यासह आंबेडकरी चळवळीतील चंद्रकांता सोनकांबळे, देवेंद्र तायडे, राहुल डंबाळे, बाबा कांबळे, सुवर्णा डंबाळे, अनिता साळवे, संतोष निसर्गंध, अजीज शेख, सुनील ढसाळ, धर्मपाल तंतरपाळे, कुणाल वावळकर, विनोद चांदमारे, साकी गायकवाड, मनोज गरबडे, संतोष जोगदंड, अजय लोंढे, राजेंद्र साळवे, रमेश चिमुरकर, प्रकाश भूतकर, विष्णु सरपते, आबा रणधीर आदि उपस्थित होते.