मुलगाचा हवा या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

पत्नीने दोन मुलींना जन्म दिल्याच्या कारणावरून आरोपी योगेंद्र हा गेल्या तीन वर्षापासून पत्नीचा छळ करत होता. पतीच्या शारिरीक व मानसिक जाचाला कंटाळून विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

    पिंपरी: दोन मुली असल्याने पतीकडून होणाऱ्या छळाला कंटाळून पत्नीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीला अटक करण्यात आली आहे. हिंजवडी येथे हा प्रकार घडला.
    योगेंद्र मिनबहादूर साही (वय २४, रा. हिंजवडी) असं अटक केलेल्या पतीचे नाव आहे. विवाहितेच्या आईने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. योगेंद्र याच्या पत्नीने दोन मुलींना जन्म दिल्याच्या कारणावरून आरोपी योगेंद्र हा गेल्या तीन वर्षापासून पत्नीचा छळ करत होता. पतीच्या शारिरीक व मानसिक जाचाला कंटाळून विवाहितेने  राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. फौजदार रेळेकर तपास करत आहेत.