children infected with corona

लहान मुले आणि नवजात अर्भकांसाठी कोरोनावरील वेगळी लस सीरम इन्स्टिट्यूटच्या वतीनं तयार करण्यात येत असून बालकांचा जन्म होताच ती लस दिली जाणार आहे. ऑक्टोबरपासूनच ही लस देता येऊ शकेल, अशी माहिती सीरम इन्स्टिट्यूटचे संचालक पी. सी. नंबीयार यांनी काही महिन्यांपूर्वी एका कार्यक्रमात दिलीय.

    कोरोनाचा नवा स्ट्रेन लहान मुलांसाठी घातक असल्याचं गेल्या काही दिवसांत लक्षात येऊ लागलंय. त्यामुळं लहान मुलांसाठीची लस कधी येणार , याची उत्कंठा वाढलीय. कोरोनावर परिणामकारक ठरणारी आणि केवळ लहान मुलांसाठी वेगळ्या पद्धतीनं तयार करण्यात आलेली लस ऑक्टोबरपर्यंत तयार होईल, अशी घोषणा सीरम इन्स्टिट्यूटच्या वतीनं करण्यात आलीय .

    लहान मुले आणि नवजात अर्भकांसाठी कोरोनावरील वेगळी लस सीरम इन्स्टिट्यूटच्या वतीनं तयार करण्यात येत असून बालकांचा जन्म होताच ती लस दिली जाणार आहे. ऑक्टोबरपासूनच ही लस देता येऊ शकेल, अशी माहिती सीरम इन्स्टिट्यूटचे संचालक पी. सी. नंबीयार यांनी काही महिन्यांपूर्वी एका कार्यक्रमात दिलीय.

    एखाद्या मुलाला कोरोनाची लागण झाल्याचं आढळलं, तरीही ही लस देता येणार आहे. सीरम इन्स्टिट्यूटकडून इतरही चार लसींवर काम सुरू असून लवकरच त्या बाजारात उपलब्ध होणार असल्याची माहिती नंबियार यांनी दिलीय. नोवोव्हॅक्स ही लस जूनमध्ये उपलब्ध होणार आहे. तर मुलांसाठीची लस ऑक्टोबर महिन्यात बाजारात येणार आहे. तर कोवी-व्हॅक या लसीची चाचणी दुसऱ्या टप्प्यावर असल्याची माहिती देण्यात आलीय.

    एप्रिल महिन्यापासून कोव्हिशिल्ड लसीचं उत्पादन वाढवण्यात येणार असून दर महिन्याला २० कोटी लसींचं उत्पादन केलं जाणार आहे. सध्या दरमहा १० कोटी लसींचं उत्पादन केलं जातं. ते एप्रिलपासून दुप्पट होईल. मात्र या लसींच्या विक्री आणि वितऱणाबाबतचं धोरण हे केंद्र सरकारच्या निर्देशांनुसारच ठरवलं जाईल, असंही सीरमच्या वतीनं स्पष्ट कऱण्यात आलंय.