मनसेच्या शिरूर हवेली तालुकाध्यक्षपदी तेजस यादव

    शिरूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (Maharashtra Navnirman Sena) शिरूर हवेली तालुकाध्यक्षपदी तेजस यादव (Tejas Yadav) यांची निवड करण्यात आली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार मनसे नेते अनिल शिदोरे, बाबू वागस्कर, दिलीप बापू धोत्रे यांनी ही निवड केली.

    मनसेचे जिल्हाध्यक्ष समीर थिगळे, कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष मनोज खराबी, पंचायत समिती सदस्य विजय रणसिंग, ग्रामपंचायत सदस्य प्रदीप पवार, जनहित कक्षाचे जिल्हाध्यक्ष सुशांत कुटे, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष किरण गव्हाणे, मनविसेचे जिल्हा उपाध्यक्ष मंगेश सावंत, चित्रपट सेनेचे तालुकाध्यक्ष नाना लांडे, मनसेचे शिरूर शहर अध्यक्ष अविनाश घोगरे संदीप कडेकर, हवेली तालुका संघटक काकासाहेब गायकवाड, रवींद्र गुळादे, आबा वाळके, भरत काळे, अभय लांडगे, सचिन यादव, संतोष यादव, बाळासाहेब चव्हाण, प्रमोद चव्हाण, संतोष कुसाळकर आदी यावेळी उपस्थित होते.