Terrible accident on Mumbai-Pune mega highway; The bus heading to Sangli for Sakharpudya overturned; 25 passengers injured

बस ४० प्रवासी घेवून मुंबई जवळील शहापूर येथून सांगलीकडे एका साखरपुडयाच्या कार्यक्रमासाठी निघाली होती. किवळे एक्झिट येथे ही बस आली असता चालकाचा बसवरील ताबा सुटला. यामुळे बस रस्त्याच्या बाजूला उलटली. अपघातानंतर बस चालक फरार झाला.

पिंपरी : चालकाचे नियंत्रण सुटल्याने पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरून एका बसला भीषण अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने किवळे येथे बस उलटल्याने हा अपघात झाला. यात २५ प्रवासी जखमी झाले आहेत.

रविवारी दुपारी बारा वाजताच्या सुमारास एक्सप्रेस वे एक्झिट किवळे येथे हा अपघात झाला. एम एच ०४ / एफ के ३७८६ ही बस ४० प्रवासी घेवून मुंबई जवळील शहापूर येथून सांगलीकडे एका साखरपुडयाच्या कार्यक्रमासाठी निघाली होती. किवळे एक्झिट येथे ही बस आली असता चालकाचा बसवरील ताबा सुटला. यामुळे बस रस्त्याच्या बाजूला उलटली. अपघातानंतर बस चालक फरार झाला.

या अपघातात बसमधील २५ प्रवासी जखमी झाले आहेत. त्यातील काहीजण गंभीर जखमी असल्याची माहिती मिळत आहे. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस, देहूरोड पोलीस आणि देवदूत यंत्रणा घटनास्थळी दाखल झाले.