म्हाडा पेपर फुटप्रकरण तपासात पुणे पोलिसांनी जी. ए. सॉफ्टवेअरचा मालक डॉ. प्रितिश देशमुखला अटक केली. त्यानंतर या तपासात टीईटीचा गैरव्यवहार उघड झाला. पोलिसांनी गुन्हा दाखल करत राज्य शिक्षण परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना अटक केली. गेल्या चार दिवसांपासून त्याच्याकडे तपास सुरू आहे. त्यात धक्कादायक माहिती समोर येऊ लागली आहे.
पुणे : २०१८ मधील टीईटीचा पेपर देखील फुटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, पुणे पोलिसांनी माजी शिक्षण आयुक्त सुखदेव डेरे यांना पहाटे अटक केली आहे. परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना अटक केल्यानंतर सुरू असलेल्या तपासात हा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पुणे सायबर पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री हा गुन्हा दाखल करत सुखदेव डेरे यांना पकडले आहे.
म्हाडा पेपर फुटप्रकरण तपासात पुणे पोलिसांनी जी. ए. सॉफ्टवेअरचा मालक डॉ. प्रितिश देशमुखला अटक केली. त्यानंतर या तपासात टीईटीचा गैरव्यवहार उघड झाला. पोलिसांनी गुन्हा दाखल करत राज्य शिक्षण परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना अटक केली. गेल्या चार दिवसांपासून त्याच्याकडे तपास सुरू आहे. त्यात धक्कादायक माहिती समोर येऊ लागली आहे.
दरम्यान या तपासात २०१८ मधील देखील टीईटीचा पेपर फुटला असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर रात्री गुन्हा दाखल केला. तर पहाटेच माजी शिक्षण आयुक्त सुखदेव डेरे यांना अटक करण्यात आली आहे. या घटनेने शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.