ठाकरे अजूनही स्वतःला हिंदुत्त्ववादी समजतात याचे विशेष वाटते ; चंद्रकांत पाटील याची टिका

उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडले नाही, महाशिव आघाडीची महाविकास आघाडी कशी झाली? असा सवाल चंद्रकांत पाटलांनी उपस्थित केला. त्यांनतर १८ महिन्यातच हिंदुत्वापासून कसे बाजूला सरलात. असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

    पुणे: शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त मुखमंत्री उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत असताना विरोधकांवर टिका केली. अजूनही आम्ही हिंदुत्ववादी आहोत असे ते म्हणाले. उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडले नाही, महाशिव आघाडीची महाविकास आघाडी कशी झाली? असा सवाल चंद्रकांत पाटलांनी उपस्थित केला. त्यांनतर १८ महिन्यातच हिंदुत्वापासून कसे बाजूला सरलात. असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

    पुण्यात झालेल्या पंडित भास्करराव चंदावरकर यांच्या पथ नामकरण सोहळ्यात ते बोलत होते. पाटील यांच्या हस्ते कार्यक्रम पार पडला. पाटील म्हणाले, राजकीय परिणामांची काळजी न करताही ठाकरे अजूनही स्वतःला हिंदुत्त्ववादी समजतात याचे मला विशेष वाटते. अशी मिश्किल टिप्पणीही त्यांनी यावेळी केली.

    अनेक उत्तुंग व्यक्तिमत्व असे होऊन जातात ज्यांच्या स्मृती जाग्या ठेवायच्या असतात,नगरसेवक काम करत असताना त्यांनी हे भान ठेवले पाहिजे की नागरी सुविधांच्या बरोबरीने आपण ज्या प्रभागात राहतो तेथील मोठया व्यक्तींच्या स्मृती जतन केल्या पाहिजेत.संस्कृती जतन करणे हीच संस्कृती. पंडित भास्कर चंदावरकर यांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्याला त्यांचे नावं देण्याचा कार्यक्रम हा केवळ ते या ठिकाणी वास्तव्यास होते म्हणून नव्हे तर त्यांनी ह्या रस्त्यावर वृक्षारोपण केले, शिल्प उभारले व ते ह्या रस्त्याची स्वच्छता देखील करायचे, त्यामुळे त्यांचे ह्या रस्त्याशी असलेले नाते पाहता त्यांचे नावं ह्या रस्त्याला दिल्याबद्दल मी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांचे अभिनंदन करतो असेही आ. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले.