स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु होता ‘हा’ धंदा …   छापा मारत पोलिसांनी केली चार महिलांची सुटका

चार महिलांना जबरदस्तीने वेश्या व्यवसायासाठी प्राप्त करून त्यांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेत होते. पोलिसांनी चार महिलांची सुटका केली.

    पिंपरी: वेश्याव्यवसाय चालविणाऱ्या स्पा सेंटरवर(Spa Center) सामाजिक सुरक्षा विभागाने (Department of Social Security) छापा मारला. कस्पटे वस्ती – वाकड येथे केलेल्या या कारवाईत चार महिलांची सुटका केली. ही कारवाई करण्यात आली. स्पा सेंटर व्यवस्थापक दीपक नामदेव साळुंके (वय २४, रा. कस्पटे वस्ती, वाकड) याला अटक करण्यात आली आहे. अमित विश्वनाथ काटे (वय ३२, रा. पिंपळे – सौदागर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फौजदार धैर्यशील सोळंके यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

    कस्पटे वस्ती – वाकड येथे ग्रीन व्हिलेज स्पा सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यानुसार, सायंकाळी साडेसातच्या सुमारास स्पा सेंटरवर छापा मारून कारवाई करण्यात आली. आरोपी चार महिलांना जबरदस्तीने वेश्या व्यवसायासाठी प्राप्त करून त्यांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेत होते. पोलिसांनी चार महिलांची सुटका केली. वाकड पोलीस तपास करत आहेत.