परीक्षांच्या घोळावर अखेर पडदा; विद्यापीठाच्या परीक्षा ११ एप्रिलपासून

ॲानलाईन परीक्षा घेणारी कंपनी बदलायची आहे असे कारण देत ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी परीक्षा मंडळांची बैठक आज आयोजित करण्यात आली होती. त्यात हा निर्णय घेण्यात आला आहे.

    पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सुरु असलेल्या परीक्षांच्या घोळावर अखेर पडदा पडला आहे. विद्यापीठाने ११ एप्रिल पासुन परीक्षा सुरु करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. याचे डिटेल वेळापत्रक २५ मार्च रोजी जाहीर केले जाणार आहे. पुणे विद्यापीठाच्या प्रथम सत्राची परीक्षा मार्च महिन्यात होणार होती. मात्र ॲानलाईन परीक्षा घेणारी कंपनी बदलायची आहे असे कारण देत ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी परीक्षा मंडळांची बैठक आज आयोजित करण्यात आली होती. त्यात हा निर्णय घेण्यात आला आहे.