A womans throat slit from a love affair

प्रमोद जाधव हे सैन्यदलातून निवृत्त झाले आहेत. लोहगाव परिसरात पत्नी आणि दोन मुलांसह ते राहत होते. प्रमोद जाधव यांना दारूचे व्यसन होते. दारू पिल्यानंतर तो पत्नीला मारहाण करायचा. त्यामुळे मागील वर्षभरापासून पत्नी त्याच्यासोबत राहत नव्हती.

    पुणे : पत्नीसह सासू, मेहुण्यांनी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याने निवृत्त सैनिकाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. लोहगाव परिसरात हा प्रकार घडला आहे.

    प्रमोद रघुनाथ जाधव (वय 39) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पत्नी ज्योती जाधव, सासु सुषमा दळवी, आणि मेहुणे राकेश दळवी, कैलास दळवी यांच्यावर विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रमोद जाधव हे सैन्यदलातून निवृत्त झाले आहेत. लोहगाव परिसरात पत्नी आणि दोन मुलांसह ते राहत होते. प्रमोद जाधव यांना दारूचे व्यसन होते. दारू पिल्यानंतर तो पत्नीला मारहाण करायचा. त्यामुळे मागील वर्षभरापासून पत्नी त्याच्यासोबत राहत नव्हती.

    दरम्यान गेल्या आठवड्यात (दि. 11 जानेवारी) मुलांच्या शाळेसंदर्भातील काही कागदपत्र घेण्यासाठी ज्योती जाधव या लोहगाव येथील घरी आल्या होत्या. यावेळी पुन्हा त्यांच्यात भांडण झाले. प्रमोदने ज्योतीला मारहाण केली. यात गंभीर दुखापत झाल्याने रुग्णालयात दाखल करावे लागले होते. रुग्णालयात ज्योती यांची आई आणि दोन मेहुणे आले. त्यानंतर सर्वांनी घरी जाऊन प्रमोद जाधव यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली आणि ते निघून गेले.

    दरम्यान दोन दिवस झाले तरी प्रमोद हा घराबाहेर पडलाच नव्हता. त्यानंतर तो घरातच मृतावस्थेत आढळला. शवविच्छेदन अहवालात बेदम मारहाण झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर विमानतळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अधिक तपास पोलीस करत आहेत.