कोरेगाव भीमा विजय रणस्तंभास भेट देऊन आढावा घेताना आनंदराज आंबेकर सह सर्जेराव वाघमारे.
 कोरेगाव भीमा विजय रणस्तंभास भेट देऊन आढावा घेताना आनंदराज आंबेकर सह सर्जेराव वाघमारे.

वाघोली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा व प्रशासन आपल्या सोबत आहे तरी देखील प्रत्येकाने कोरोना पासून वाचण्यासाठी दक्ष राहवे.सद्यस्थितीत सर्व धार्मिक स्थळी मंदिरे चालू झाली आहेत.मंदिरे उघडल्यानंतर लाखोंच्या संख्येने गर्दी झाली.पण भीमा कोरेगाव विजय रणस्तंभ ठिकाणी १ जानेवारी हा एकच दिवस माणसाचा असतो

वाघोली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा व प्रशासन आपल्या सोबत आहे तरी देखील प्रत्येकाने कोरोना पासून वाचण्यासाठी दक्ष राहवे.सद्यस्थितीत सर्व धार्मिक स्थळी मंदिरे चालू झाली आहेत.मंदिरे उघडल्यानंतर लाखोंच्या संख्येने गर्दी झाली.पण भीमा कोरेगाव विजय रणस्तंभ ठिकाणी १ जानेवारी हा एकच दिवस माणसाचा असतो. यामध्ये शासनाने अजून तर काहीच सांगितले नाही,उपाययोजना नाहीत,शासनाने अजूनही काहीच आदेश काढलेले नाहीत.शासनाने येणाऱ्या १ जानेवारी च्या कार्यक्रमाला अजून तर काय योग्य ती तयारी केली असे वाटत नाही.तर आंबेडकर जनतेला कोणतीही माहिती दिलेली नाही.त्यामुळे याबाबत पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांच्याशी आम्ही लवकरच बोलणार आहे.सरकारचा काय मानस आहे ते समजल्यानंतरच आमची भूमिका मांडू.या कार्यक्रसाठी मी व माझे कुटुंब आवर्जून उपस्थित राहणार आहे.असे मत रणस्तंभ परिसराला भेट देत कार्यक्रमांचा आढावा घेताना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांनी व्यक्त केले.

पेरणे फाटा(ता.हवेली) येथे कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ ठिकाणी मानवंदना देताना आनंदराज आंबेकर सह बौद्ध महासभेचे कार्यकर्ते व नागरिक.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १ जानेवारी २०२१ रोजी पेरणे फाटा(ता.हवेली) येथील कोरेगाव भीमा विजय रणस्तंभाला मानवंदना देण्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने विजयस्तंभास डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांनी नुकतीच भेट देत येथे बैठक घेऊन विजयस्तंभ परिसराचा आढावा घेतला. यावेळी पंचायत समिती सदस्य तथा विजय रणस्तंभ सेवा संघाचे अध्यक्ष सर्जेराव वाघमारे,रिपब्लिकन विद्यार्थी सेना प्रमुख विवेक बनसोडे,रिपब्लिकन कामगार सेना प्रमुख युवराज बनसोडे,दिपंकर इंगोले,रिपब्लिकन सेना पुणे जिल्हाध्यक्ष सुनील ढसाळ,भारतीय बौद्ध महासभा जनरल बि.एस.ढोबळे,निलेश गायकवाड,सुनील अवचार,कमलेश चाबुकस्वार,दिपंकर इंगोले आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.तसेच यावेळी पोलीस यंत्रणा तसेच महसूल प्रशासन व सर्जेराव वाघमारे यांच्याशी आनंदराज आंबेडकर यांनी चर्चा केली.

याप्रसंगी अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील,लोणीकंद ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप मानकर,सहाय्यक पोलीस निरीक्षक नवसरे,सहाय्यक पोलीस निरीक्षक लोखंडे,पोलीस उपनिरीक्षक वर्षा जगदाळे,पोलीस बाळासाहेब गाडेकर,विकास कुंभार,राजेश माने पेरणेचे सरपंच रुपेश ठोंबरे,माजी उपसरपंच रवींद्र वाळके तसेच आदी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

विजय रणस्तंभ ठिकाणी गर्दी न करता घरबसल्या ऑनलाईन लिंकवर कार्यक्रम पहावा : सर्जेराव वाघमारे

शासनाचे कार्यक्रमाचे परिपत्रक आलेले आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ परिसरारात कोणतीही गर्दी न करता कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ सेवा संघाच्या वतीने सालाबादप्रमाणे पारंपरिक कार्यक्रम होणार आहे तरी नागरिकांनी मानवंदना देण्यासाठी गर्दी करू नये.घरबसल्या मानवंदना द्यावी.यासाठी संघाच्या वतीने एक ऑनलाईन लिंक देण्यात येईल या लिंकवर देशभर घर बसल्या हा कार्यक्रम पाहता येऊ शकतो.व प्रसार माध्यमातून हा कार्यक्रम घर बसल्या दिसणार आहे.अशी माहिती कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ सेवा संघाचे अध्यक्ष सर्जेराव वाघमारे यांनी दिली.

भारतीय बौद्ध महासभेच्यावतीने स्तंभास मानवंदना

भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत विजय रणस्तंभाला मानवंदना दिली महासंघाचे मेजर जनरल पांडुरंग ढोबळे,भारतीय बौद्ध महासभा जिल्हाध्यक्ष रघुनाथ साळवे,शाखा भीमा कोरेगाव विजय रणस्थभ सचिन चव्हाण,जिल्हा सचिव संजय माने,पेरणे शिवहरी गायकवाड,पूर्व हवेली संरक्षण सचिव विजय गायकवाड आदी या मध्ये सहभागी झाले होते.