खासदार विनायक राऊत यांना निवेदन देताना कल्याणी वाघमोडे.
खासदार विनायक राऊत यांना निवेदन देताना कल्याणी वाघमोडे.

बारामती :राष्ट्रपुरुष व थोर व्यक्ती यांचे जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाच्या १५ डिसेंबर २०२० रोजी काढलेल्या शासनाच्या परिपत्रकात दुरुस्ती करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना मेलद्वारे निवेदन देण्यात आले असून एक प्रत शिवसेना सचिव व खासदार विनायक राऊत यांना क्रांती शोर्य सेना अध्यक्ष कल्याणी वाघमोडे यांनी दिले.

सन २०२१ मध्ये राष्ट्रपुरुष तथा थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन साजरा करण्याबाबत हे परिपत्रक आहे .या शासन निर्णय मध्ये क्रमांक १७ वर “आहिल्यादेवी होळकर जयंती ” असा उल्लेख झाला आहे. यामध्ये चूक झालेली असून “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती” अशी दुरुस्ती करण्यात यावी ,यासाठी हे निवेदन देण्यात आले .२८ वर्षे राज्यकर्ती महिला म्हणून एकमेव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा इतिहास सर्व जगाला ज्ञात आहे ,त्यामुळे उपरोक्त शासन निर्णय मध्ये झालेली चूक मुळे समाजामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून रोष नोंदविण्यात आला . तरी सर्व समाजाच्या वतीने शासन निर्णयामध्ये योग्य तो बदल करून अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाप्रमाणे सन्मान देऊन सुधारित परिपत्रक शासनाच्या वतीने काढावे, ही विनंती यातून कल्याणी वाघमोडे यांच्या वतीने करण्यात आली आहे.