पुण्यात आजपर्यंत एकाच दिवशी सर्वात जास्त २९१ रुग्ण

शहरात १४ कोरोना ग्रस्तांचा मृत्यू पुणे : शहरातील कोरोना बाधितांचा आकडा २९१ ने वाढला आहे. आजपर्यंत एकाच दिवशी सर्वात जास्त रुग्ण शुक्रवारी आढळून आले असून, कोरोना बाधितांचा वाढणारा आकडा धडकी

शहरात १४ कोरोना ग्रस्तांचा मृत्यू 


पुणे : शहरातील कोरोना बाधितांचा आकडा २९१ ने वाढला आहे. आजपर्यंत एकाच दिवशी सर्वात जास्त रुग्ण शुक्रवारी आढळून आले असून, कोरोना बाधितांचा वाढणारा आकडा धडकी भरविणारा आहे. शहरात १४ कोरोना ग्रस्तांचा मृत्यू  झाला आहे. शहरातील कोरोना बळींची संख्या २४१ झाली आहे. 

पुण्यातील कोरोनाचा प्रसार नियंत्रणात येण्याची चिन्हे दिसत नाही. सलग दुसऱ्या दिवशी कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. शहराच्या पश्चिम भागास वगळता उर्वरित भागात कोरोना वेगाने फैलावत आहे.पुणे शहर आणि जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या कमी व्हावी, यासाठी शासन आणि प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. राज्यातील अनेक भागातील लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणण्यात आली असली तरीही पुण्यातील कंटेन्मेंट परिसरात अजूनही कडक निर्बंध ठेवण्यात आले आहेत. मात्र असं असलं तरी पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढतच चालली आहे. त्यातच आता एकाच दिवशी १९ कोरोनाबाधित रुग्ण वाढल्याने पुण्यातील आणखी एक परिसर कंटेन्मेंट घोषित करण्यात आला आहे.’कोरेगाव पार्कमधील संत गाडगे महाराज वस्ती भागात एकाच दिवसांत १९ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने तातडीने या भागाची पाहणी आयएएस अधिकारी सौरव राव यांच्यासमवेत केली. पाहणीनंतर हा भाग कंटेन्मेंट घोषित करण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला असून उपाययोजनांच्या बाबतीतही संपूर्ण नियोजन केले आहे,’ अशी माहिती पुण्याचे महपौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

पुणे विभागातील २ हजार ९२७ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या ६ हजार २९ झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण २ हजार ८०७ आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण २९५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच १९७ रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

यापैकी पुणे जिल्हयातील ५ हजार १४ बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित २ हजार ५५२ रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या २ हजार २१२ आहे. कोरोनाबाधित एकूण २५० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच १९० रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. 

कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये पुणे जिल्ह्यात २९७, सातारा जिल्ह्यात २०, सोलापूर जिल्ह्यात ४६, सांगली जिल्ह्यात ३, कोल्हापूर जिल्ह्यात ४९ अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

सातारा जिल्हयातील २०१ कोरोना बाधीत रुग्ण असून १०६ बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या ९० आहे. कोरोनाबाधित एकूण ५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

सोलापूर जिल्हयातील ५२४ कोरोना बाधीत रुग्ण असून २१८ बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या २६९ आहे. कोरोना बाधित एकूण ३७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हयातील ६२ कोरोना बाधीत रुग्ण असून ३८ बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या २३ आहे. कोरोना बाधित एकूण १ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्हयातील २२८ कोरोना बाधीत रुग्ण असून १३ बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या २१३ आहे. कोरोना बाधित एकूण २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आजपर्यत विभागामध्ये एकुण ६५ हजार ५५१ नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी ५६ हजार ४४५ नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर ९ हजार १४९ नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी ५० हजार ३१४ नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून ६ हजार २९ चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

 रात्री ७ ते सकाळी ७ संचारबंदी 

पुणे शहरात संध्याकाळी सात ते सकाळी सात यावेळेत संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. ३१ मे पर्यत ही संचारबंदी असणार आहे. सहपोलीस आयुक्त राजेंद्र शिसवे यांनी संचारबंदीचे आदेश काढले आहेत. या आदेशानुसार संध्याकाळी ७ ते सकाळी ७ या वेळेत पुणे शहर, पुणे आणि खडकी कॉटेन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील नागरिकांना घराबाहेर पडता येणार नाही. संचारबंदी आदेशानुसार रस्त्यावर वाहन आणणे, रस्त्यावर उभे राहणे यास सक्त मनाई आहे. संचारबंदीचे नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.

आकडेवारी 

– शुक्रवारी २९१ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.

– शुक्रवारी घरी सोडलेले रुग्ण – १८९

– बरे होऊन घरी सोडलेले आता पर्यतचे

एकूण रुग्ण – २३७१

– शुक्रवारी एकूण मृत्यू -१४

– पुण्यातील एकूण मृत्यू – २४२

– शहारतील एकूण गंभीर रुग्ण – १६८

– व्हेंटिलेटरवर उपचार सुरू असलेले रुग्ण – ४९

– पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या – ४३९८

– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या – १७८६

– शुक्रवारी झालेल्या एकूण चाचण्या- १७३५