पुण्यात पुन्हा पावसाचा अंदाज; पुढील काही दिवस…

    पुणे : शहरात पुढील काही दिवस पावसाच्या हलक्या सरी बरसण्याचा अंदाज हवामान खात्याच्या पुणे वेधशाळेने वर्तविला आहे. जिल्ह्यांत या हंगामात आजपर्यंत सरासरीच्या आठ टक्के जास्त पाऊस झाला आहे.

    सध्या उत्तर प्रदेशांत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून, त्याचा फारसा परिणाम राज्यात हाेणार नाही. या हंगामात राज्यात सरासरी पेक्षा अधिक १४ टक्के जास्त पाऊस झाला आहे.  मुंबईत सामान्य, काेकण गाेवा विभागात  ३३ टक्के अधिक,  मध्यमहाराष्ट्रात १४ टक्के अधिक , मराठवाड्यात ३२ टक्के पाऊस झाला. ऑगस्ट महीन्याखेरपर्यंत विदर्भात पावसाने सरासरी पेक्षा कमी हजेरी लावली हाेती. परंतु गेल्या काही दिवसांत पावसाने जाेरदार हजेरी लावल्याने सरासरीपर्यंत आकडा पाेचला असुन, सरासरीच्या तुलनेत तीन टक्के कमी पाऊस झाला आहे.

    राज्यातील नंदुरबार जिल्ह्यात सरासरीच्या तुलने कमी पाऊस झाला आहे. पुणे जिल्ह्यांत सरासरीच्या तुलनेत आठ टक्के अधिक पाऊस पडला आहे. शहरांत पावसाची सरासरी ही सामान्य राहीली आहे. पुढील तीन दिवस शहरांत  ढगाळ हवामान राहील. तसेच  पावसाच्या हलक्या सरी पडण्याचा अंदाज आहे. त्यानंतर  पाऊस वाढण्याची शक्यता असून, मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेने व्यक्त केली आहे.