नववर्ष स्वागत पार्ट्यांवर ‘वॉच’

याबाबत राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे अधीक्षक संतोष झगडे म्हणाले, ‘उपधीक्षक यांच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आलेल्या या पथकांमध्ये प्रत्येकी पाच निरीक्षक आणि जवान आहेत. पुणे शहर, पिंपरी-चिंचवड शहर आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागासाठी ही पथके असून, त्यांच्याकडून उपाहारगृहे आणि विविध ठिकाणांची तपासणी केली जाणार आहे.

    पुणे : नववर्षांनिमित्त शहरात अनेक ठिकाणी उपाहारगृहे किंवा खासगी ठिकाणी पार्ट्यांचे आयोजन केले जाते. खासगी ठिकाणी पार्टीचे आयोजन करताना परवानगी घेणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे शहर आणि परिसरात बेकायदा किंवा भेसळयुक्त मद्यविक्री होऊ नये, यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने पाच खास पथके नियुक्त केली आहेत. या पथकांकडून संशयित ठिकाणी तपासणी केली जाणार आहे.

    ‘उपधीक्षक यांच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आलेल्या या पथकांमध्ये प्रत्येकी पाच निरीक्षक आणि जवान आहेत. पुणे शहर, पिंपरी-चिंचवड शहर आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागासाठी ही पथके असून, त्यांच्याकडून उपाहारगृहे आणि विविध ठिकाणांची तपासणी केली जाणार आहे. त्याचबरोबर दोन भरारी पथके देखील असणार आहेत. या पथकांकडून विविध ठिकाणी छापे टाकले जाणार आहेत.’ अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे अधीक्षक संतोष झगडे यांनी दिली.