राज्य सरकारकडून अधिसुचना, राजकीय समीकरणे बदलणार

या तेवीस गावांचा महापािलका हद्दीत समाविष्ट झाल्याने शहरातील राजकीय गणित बदलू शकते. या गावांत प्रामुख्याने राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्राबल्य अाहे. त्याचा फायदा महापािलका निवडणुकीत हाेऊ शकताे. या गावांचा समावेश झाल्याने अाता महापािलकेची प्रभाग रचना तयार करण्याच्या कामाला सुरुवात केली जाईल.

  पुणे: महापािलका हद्दीत २३ गावे समाविष्ट करण्यात आली आहे. यासंदर्भातील अधिसुचना राज्य सरकारने बुधवारी काढली. यामुळे पुणे महापािलका ही राज्यातील सर्वांत माेठी क्षेत्रफळ असणारी महापािलका ठरली आहे, आगामी महापािलका निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर ही गावे हद्दीत समाविष्ट केली जात असल्याने शहरातील राजकीय गणिते बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
  गेल्यावर्षी राज्य सरकारने डिसेंबर महीन्यात महापािलका हद्दीत तेवीस गावे समाविष्ट करण्याचा इरादा जाहीर केला हाेता. त्यानंतर यावर हरकती आणि सुचना मागविण्यात आल्या हाेत्या. दरम्यान, महापािलका वगळून उर्वरीत भागाचा विकास आराखडा करण्याचे काम हे पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाकडून ( पीएमआरडीए ) केले जात हाेते. या विकास आराखड्याच्या मुद्द्यामुळे ही गावे महापािलका हद्दीत समाविष्ट करण्याची अधिसुचना काढण्यास विलंब झाल्याचे बाेलले जात आहे. ही गावे समाविष्ट करण्याची अधिसुचना या महीन्याच्या अखेरीला काढली जाईल अशी शक्यता व्यक्त केली जात हाेती. त्यानुसार ही अधिसुचना जारी करून गावे महापािलका हद्दीत समाविष्ट केली गेली आहेत.

  महापािलका हद्दीत समाविष्ट केलेली गावे पुढील प्रमाणे : म्हाळुंगे, सुस, बावधन बुद्रुक , किरकटवाडी, पिसाेळी, काेंढवे - धावडे, काेपरे, नांदेड, खडकवासला, मांजरी बुद्रुक, नऱ्हे , हाेळकरवाडी, औताडे- हांडेवाडी, वडाची वाडी, शेवाळ वाडी, नांदाेशी, सणसनगर, मांगडेवाडी,भिलारेवाडी, गुजर िनंबाळकरवाडी, जांभुळवाडी, काेळेवाडी, वाघाेली.

  या तेवीस गावांचा महापािलका हद्दीत समाविष्ट झाल्याने शहरातील राजकीय गणित बदलू शकते. या गावांत प्रामुख्याने राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्राबल्य अाहे. त्याचा फायदा महापािलका निवडणुकीत हाेऊ शकताे. या गावांचा समावेश झाल्याने अाता महापािलकेची प्रभाग रचना तयार करण्याच्या कामाला सुरुवात केली जाईल. त्याबाबतचे आदेशही जुलै महीन्यात काढले जाण्याची शक्यता आहे. महापािलकेच्या सभागृहातील सदस्यांची संख्याही वाढू शकते. ती साधारण १८० च्या आसपास असेल, परंतु, १८० च्या पुढे सदस्य संख्या गेल्यास एक सदस्यीय वाॅर्ड पद्धतीनुसार निवडणुक हाेईल.

  राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून निर्णयाचे स्वागत
  महापािलका हद्दीत तेवीस गावांचा समावेश करण्याच्या निर्णयामुळे या भागाचा नियाेजित विकास हाेण्यास मदत हाेईल अशी प्रतिक्रीया राष्ट्रवादी काॅंग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, महापािलकेतील विराेधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, तसेच आमदार चेतन तुपे, आमदार सुनीलटिंगरे गरे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांनी व्यक्त केली आहे