‘नेमून दिलेले काम करा’ , असे सांगणाऱ्या अधिकाऱ्यावर कोयत्याने वार ; दोन जणांना अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नऱ्हे येथील भंडारी भोसले इंडस्ट्रीज कंपनीत सुपरवायझर म्हणून कार्यरत आहेत. तेथेच आरोपीही काम करतात. दरम्यान, चार जूनला रात्री नऊच्या सुमारास आरोपी त्यांचे काम सोडून इतरत्र फिरताना आढळून आले. तेव्हा फिर्यादी यांनी त्यांना बोलावून चहा, नाश्ता करून तुला दिलेले काम करून घे, असे बजावले. त्याचा राग आरोपींना आला.

    पुणे : ‘कंपनीत इतरत्र फिरण्यापेक्षा नेमून दिलेले काम करा,’ असे सांगणाऱ्या सुपरवायझरला दोन कर्मचाऱ्यांनी आणि त्यांच्या साथीदारांनी बेदम मारहाण केली. यात सुपरवायझर गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी संदीप नाईक (वय ४३, रा. नऱ्हे) यांनी सिंहगड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून रोहित चौगुले (वय २१) आणि तुषार चव्हाण (वय २१ दोघेही, रा. नऱ्हे) यांच्यासह त्यांच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नऱ्हे येथील भंडारी भोसले इंडस्ट्रीज कंपनीत सुपरवायझर म्हणून कार्यरत आहेत. तेथेच आरोपीही काम करतात. दरम्यान, चार जूनला रात्री नऊच्या सुमारास आरोपी त्यांचे काम सोडून इतरत्र फिरताना आढळून आले. तेव्हा फिर्यादी यांनी त्यांना बोलावून चहा, नाश्ता करून तुला दिलेले काम करून घे, असे बजावले. त्याचा राग आरोपींना आला. त्यामुळे त्यांनी काही मित्रांना बोलावून कोयत्याने फिर्यादीच्या डोक्यात मारून, इतर साथीदारांनी लाकडी स्टंप आणि बांबूने मारहाण केली, अशी माहिती सिंहगड पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक नितीन जाधव यांनी दिली..