Social media वरून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्याच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

राष्ट्रवादी युवकच्या पदाधिकाऱ्यांनी या अभिजित लिमयेच्या तोंडाला काळे फासत त्याच्याकडून पुन्हा असे करणार नाही, असं वदवून घेतले.

    पुणे: गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी कारवाईची मागणी केली होती. लखोबा लोखंडे या फेसबुक पेजवरून हे लिखाण केले जात होते. तसेच ‘मला पकडून दाखवल्यास १०० कोटी रुपयांचे बक्षीस देणार’ असे चॅलेंज देणाऱ्या या पेजचा चालक अभिजीत लिमये याच्या पुणे सायबर क्राईमने मुसक्या आवळल्या असून , सांगली येथून त्याला ताब्यात घेण्यात आले

    यावेळी राष्ट्रवादी युवकच्या पदाधिकाऱ्यांनी या अभिजित लिमयेच्या तोंडाला काळे फासत त्याच्याकडून पुन्हा असे करणार नाही, असं वदवून घेतले. सोशल मीडियावर व्यक्त होताना प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, परंतु मोठ्या कष्टाने ज्या नेत्यांनी आपली कारकीर्द घडवली त्यांच्या बद्दल आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस अशाच प्रकारे समाचार घेणार, असे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी यावेळी सांगितले.