१२२ कोटींच्या निविदेचा विक्री कालावधी ४५ ऐवजी २८ दिवसांनी घटविला !

केंद्र सरकारच्या राष्ट्रीय सुधारणा अभियाना अंतर्गत (अमृत) महापालिका हद्दीत मलनि:सारण व्यवस्था प्रकल्प राबविण्यात येत आहे. मात्र, 'अमृत' योजनेअंतर्गत मंजुर योजनेतील मैलाशुद्धीकरण केंद्र आणि पंपींग स्टेशन उभारण्याचे काम कायदेशीर बाबाींमुळे पुर्ण झालेले नाही. त्यामुळे महापालिकेने १२२ कोटी २९ लाख ४८ हजार ७४० रुपयांची निविदा नव्याने प्रसिद्ध केली आहे.

    पिंपरी : केंद्र शासनाच्या ‘अमृत’ योजनेअंतर्गत ३ ठिकाणी मैलाशुद्धीकरण प्रकल्प आणि पंपींग स्टेशन बांधणे, मलवाहिन्यांचे जाळे उभारणे याकामी महापालिकेने १२२ कोटी २९ लाख ४८ हजार ७४० रुपयांची निविदा प्रसिद्ध केली आहे. तथापि, ‘तातडीची’ बाब असल्याचे भासवत या कामाची अल्प मुदतीची निविदा काढण्यात आली आहे. नवनियुक्त आयुक्त राजेश पाटील यांनी निविदा विक्रीचा कालावधी ४५ दिवसांऐवजी २८ दिवसांचा केल्याने संशय व्यक्त केला जात आहे.

    नागरी भागामध्ये तयार होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करणे आणि पुनर्चक्रीकरण – फेरफार करण्याकामीचा ‘मास्टर प्लॅन’ पिंपरी – चिंचवड महापालिकेने तयार केला आहे. त्यात गुणवत्तापुर्ण मलप्रक्रिया व्यवस्था उभारण्याच्या कामाचा समावेश आहे. त्यासाठी पारंपरिक तंत्रज्ञानाबरोबरच नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत शहरात ९ ठिकाणी १४ मैलाश्ुद्धीकरण क्रेंद्र कार्यान्वित आहेत. त्यांची प्रतिदिन क्षमता ३५३ द.ल.लि.आहे. शहरात १ हजार ५६६ किलोमीटर मलनिस्सारण नलिका टाकण्यात आल्या आहेत. मैलाशुद्धीकरण केंद्रात येणाऱ्या सुमारे २७० ते २७५ दशलक्ष लिटर प्रतिदिन सांडपाण्यावर प्रक्रीया करण्यात येत आहे. या मैलाशुद्धीकरण वेंâद्रांवर स्काडा प्रणालीद्वारे देखरेख ठेवली जाते. स्मार्ट सिटी अंतर्गत ही स्काडा प्रणाली कार्यान्वित करण्याचे प्रस्तावित आहे.

    चिखली येथे महापालिकेने १२ एमएलडी क्षमतेचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचे काम हाती घेतले. तथापि, इंद्रायणी नदीपात्रालगत उभारण्यात येणारा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प बेकायदेशीर असून नदीपात्रालगत निळ्या पूररेषेत हा प्रकल्प उभारला जात आहे. त्यामुळे हा प्रकल्प जमीनदोस्त करावा, असा आदेश राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने जानेवारी २०२० मध्ये महापालिकेला दिला. या संडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे काम पाच टक्के झाले होते. मात्र, राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशानुसार हे बांधकाम पाडण्यात आले. आता याच कामासाठी नव्याने एकत्रितपणे निविदा काढण्यात आली आहे.

    केंद्र सरकारच्या राष्ट्रीय सुधारणा अभियाना अंतर्गत (अमृत) महापालिका हद्दीत मलनि:सारण व्यवस्था प्रकल्प राबविण्यात येत आहे. मात्र, ‘अमृत’ योजनेअंतर्गत मंजुर योजनेतील मैलाशुद्धीकरण केंद्र आणि पंपींग स्टेशन उभारण्याचे काम कायदेशीर बाबाींमुळे पुर्ण झालेले नाही. त्यामुळे महापालिकेने १२२ कोटी २९ लाख ४८ हजार ७४० रुपयांची निविदा नव्याने प्रसिद्ध केली आहे. चिखली येथे १२ एमएलडी, बोपखेल येथे ५ एमएलडी आणि पिंपळे – निलख येथे १५ एमएलडी क्षमतेचे सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारण्याचे प्रस्तावित आहे.या कामी ६२ कोटी ५७ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. याखेरिज, सांडपाणी व्यवस्थेचे २३ किलोमीटर जाळे उभारणे, ट्रंकमेन, पंपिंग केंद्र बांधणे, नालाबंध, सीमाभिंत बांधणे, टर्शरी पद्धतीने प्रक्रिया करणे, पाच वर्ष संचलन, देखभाल – दुरुस्ती या कामासाठी सुमारे ५० कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

    या १२२ कोटी रुपयांच्या कामासाठी कायद्यानुसार, ४५ दिवसांची निविदा विक्री कालावधी क्रमप्राप्त असताना आयुक्त राजेश पाटील यांनी अल्पमुदतीची निविदा प्रसिद्ध केली आहे. १६ जून २१ रोजी या कामाची निविदा प्रसिद्ध झाली आहे. तर, निविदा भरण्याचा कालावधी २८ दिवस म्हणजे, १५ जुलै २१ पर्यंत कमी केला आहे. हे काम १ वर्षाच्या आतमध्ये पुर्ण करण्याच्या अटीवर शासनाने सुधारित प्रकल्प अहवालास मान्यता दिली आहे. कामाची तातडी विचारात घेता ४५ दिवसांऐवजी २८ दिवस केल्याचा दावा प्रशासकीय अधिकाऱ्याने केली. तर, आयुक्त राजेश पाटील यांच्याशी संपर्वâ साधला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.