सामाजिक सुरक्षा विभागाने केला १३ लाखांच्या गुटख़्यासह ३६.७९ लाखांचा माल जप्त

या कारवाईमध्ये पोलिसांनी८ हजार ४५० रुपये रोख रक्कम, ७ लाख ५२ हजार २४२ रुपये किमतीचा गुटखा, ७ लाख २० हजारांची स्कोडा कार, ३५ हजारांचा ॲपल कंपनीचा मोबाईल फोन, असा एकूण १५ लाख १५ हजार ६९२रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंपरी:पिंपरी -चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने ताथवड़े आणि चाकण परिसरात दोन ठिकाणी कारवाया करत १३लाख २९ हजार २५१ रुपये किमतीच्या गुटख्यासह ३६ लाख ७९ हजार ९१६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

नरसिंह कॉलनी, ताथवडे येथे दलपत पत्ताराम भाटी (वय २७, रा. थेरगाव) याने त्याच्या भाड्याच्या खोलीत गुटख्याची साठवणूक केली आहे. त्या गुटख्याची स्कोडाकार मधून वाहतूक करून विक्री करणार असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यानुसार पथकाने मंगळवारी (दि. २२) सापळा लावून दुपारी पावणे चार वाजता सापळा लावून कारवाई केली.

या कारवाईमध्ये पोलिसांनी८ हजार ४५० रुपये रोख रक्कम, ७ लाख ५२ हजार २४२ रुपये किमतीचा गुटखा, ७ लाख २० हजारांची स्कोडा कार, ३५ हजारांचा ॲपल कंपनीचा मोबाईल फोन, असा एकूण १५ लाख १५ हजार ६९२रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सामाजिक सुरक्षा विभागाने चाकण परिसरातील खालूंब्रे येथे आणखी एक कारवाई केली. ही कारवाई मंगळवारी दुपारी सव्वातीन वाजता चाकण-तळेगाव रोडवर खालूंब्रे येथे करण्यात आली. यात रामाराम करनाराम जाट (वय २४, रा. खालूंब्रे, ता. खेड), दिनेश भवरलाल भाटी (वय २४, मांगीलाल लख्खाराम चौधरी (वय२२, रा. सुदर्शननगर, चिंचवड), ओमप्रकाश वीरमाराम विष्णोई (रा. खालूंब्रे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपींनी बालाजी ट्रेडिंग कंपनी या दुकानात प्रतिबंधित गुटखा साठवून ठेवला होता. त्यावर पोलिसांनी छापा मारून कारवाई केली. या कारवाईमध्ये पोलिसांनी पाच लाख ७७ हजार ९ रुपये किमतीचा गुटखा, तंबाखू, सिगारेट, ७२हजार २१५ रुपये रोख रक्कम, १६ लाख ५० हजार रुपये किमतीची तीन वाहने, ६५ हजारांचे तीन मोबाईल फोन असा एकूण २१ लाख ६४ हजार २२४रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.