पुण्यात खळबळ! लग्नाच्या दहा दिवस आधीच पोलिस कर्मचारी असलेल्या महिलेची आत्महत्या; मोबाईलमध्ये सापडला मोठा पुरावा

पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील देलवडी येथे एका महिला पोलिस कर्मचाऱ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. दिपाली कदम असे या महिला कर्मचाऱ्याचे नाव असून त्या पोलिस नाईक पदावर सेवेत होत्या(The suicide of a woman who was a police officer ten days before the wedding in Pune).

    दौंड :  पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील देलवडी येथे एका महिला पोलिस कर्मचाऱ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. दिपाली कदम असे या महिला कर्मचाऱ्याचे नाव असून त्या पोलिस नाईक पदावर सेवेत होत्या(The suicide of a woman who was a police officer ten days before the wedding in Pune).

    आत्महत्या करण्यापूर्वी दिपाली यांनी भाऊ रोहितला मोबाईलवर सुसाईड नोट पाठवली होती. पोलिस नाईक कर्मचाऱ्याच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे दिपाली यांनी सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे. याप्रकरणी पोलिस नाईक वाल्मीक अहिरे याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

    दिपाली यांचे येत्या 16 नोव्हेंबरला लग्न होते. दिपाली लग्न करणार असल्याची माहिती मिळताच अहिरेने नवरा मुलगा आणि दिपालीच्या भावाला फोन करुन धमकी दिली. या प्रकारामुळे निराश झालेल्या दिपालीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.