चोरट्यांनी घरातून दीड लाखांचा ऐवज लांबवला

खान यांच्या घरातील कपाटातून १ लाख ४७ हजार रुपये किमतीचे ५५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि रोकड चोरट्याने लांबवली

    पिंपरी: घरातून चोरट्याने १ लाख ४७ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने आणि रोकड चोरून नेली. याप्रकरणी एका संशयिता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना  थेरगाव येथे घडली.

    सिराज अहमद अब्दुलवफाक खान (वय ४१, रा. बेलठिकानगर, थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अलिमुल्ला खान (रा. बेलठिकानगर) असे संशयिताचे नाव आहे. फिर्यादी खान यांच्या घरातील कपाटातून १ लाख ४७ हजार रुपये किमतीचे ५५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि रोकड चोरट्याने लांबवली. फिर्यादी खान यांंनी अलिमुल्ला खान (रा. बेलठिकानगर) याच्या विरोधात संशय व्यक्त केला आहे. फौजदार कादबाने तपास करत आहेत.