वीजेचा धक्का बसून बैलजोडीचा करुण अंत

इंदापूर : तुटून पडलेल्या उच्चदाब विद्युत वाहिनीवर पाय पडल्याने वीजेचा धक्का बसून ऊसतोडीसाठी निघालेल्या बैलजोडीचा करुण अंत झाला.आज (दि.२२) पहाटे साडेपाच ते सहा वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील कालठण नं.१ या गावी ही दुर्घटना घडली.

कालठण नं.१ येथील श्रीराम विठ्ठल लकडे या शेतक-याच्या ऊसाची तोड चालू होती.बारामती ॲग्रो साखर कारखान्याची टोळी ऊसतोडीसाठी येत होती.त्यावेळी महावितरण विभागाच्या तुटून रस्त्यावर पडलेल्या उच्चदाब वाहिनीच्या तारेवर बैलांचा पाय पडला.वीजेचा धक्का बसून बैलगाडीला जुंपलेले दोन बैल जागेवरच मृत्युमुखी पडले.