कात्रज दर्गा आणि दोन मंदिरात चोरी, चोरट्यांनी रोख रकमेसह चांदीचे चार घोडे चोरले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार गौसुल आजम शहेंशा दस्तगीर दर्ग्यात अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत दर्ग्याच्या पाठीमागील बाजूस खिडकीतून आत प्रवेश केला. यावेळी एक स्टीलची दानपेटी आणि चांदीचे चार घोडे चोरले आहेत. त्यासोबतच दर्ग्याशेजारी असणाऱ्या शंकराच्या मंदिरातदेखील चोरट्यांनी डल्ला मारत मंदिरातून दानपेटीतील पैसे चौरले. शंकराच्या मंदिरातील दान पेटीतून 100 रुपये आणि खोपडेनगर येथील वाघजाई देवीच्या मंदिरातून दोन दानपेट्या फोडून सात हजाराची रोकड चोरुन नेली.

    पुणे : कात्रज येथील खोपडेनगर येथे एक दर्गा आणि दोन मंदिरातून चोरी करण्यात आली. तिन्ही ठिकाणाहून एकूण 42 हजाराचा ऐवज चोरण्यात आला. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी साहिल खान (36, रा.पदमावतीनगर) याने फिर्याद दिली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार गौसुल आजम शहेंशा दस्तगीर दर्ग्यात अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत दर्ग्याच्या पाठीमागील बाजूस खिडकीतून आत प्रवेश केला. यावेळी एक स्टीलची दानपेटी आणि चांदीचे चार घोडे चोरले आहेत. त्यासोबतच दर्ग्याशेजारी असणाऱ्या शंकराच्या मंदिरातदेखील चोरट्यांनी डल्ला मारत मंदिरातून दानपेटीतील पैसे चौरले. शंकराच्या मंदिरातील दान पेटीतून 100 रुपये आणि खोपडेनगर येथील वाघजाई देवीच्या मंदिरातून दोन दानपेट्या फोडून सात हजाराची रोकड चोरुन नेली.

    तसेच, वाघजाई देवी मंदिरातील दानपेटीही चोरीला गेल्याचे उघडकीस आले आहे. मागील काही दिवसांत दिवसात चोरीचे चार प्रकार उघडकीस आल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण असून पोलिसांविषयी नाराजी पसरली आहे. चोरीच्या घटना पोलिसांना रोखण्यात अपयश येत असल्याचे यातून दिसून येत आहे. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक वैभव गायकवाड करत आहेत.

    दरम्यान, मागील काही दिवसांपासून कात्रज परिसरात चोऱ्यांचे सत्र वाढल्याचे दिसत आहे. कात्रज-कोंढवा रस्ता परिसरातील शिवशंभोनगर गल्ली क्रमांक ४ मध्ये हातोड्याने घराचे कुलुप तोडून २ लाख ६५ हजारांचा ऐवज लंपास करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला होता. याप्रकरणी निरज ओझा (वय ३८) यांनी भारती विद्यापीठ पोलिसांत फिर्याद दिली होती. या चोरीच्या वाढत्या प्रकरणांमुळे कात्रज सह परिसरात भितीचे वातावरण आहे.