कंपनीतून पितळी धातूंच्या वस्तूची चोरी

शिक्रापूर : करंदी (ता. शिरूर) येथील एका कंपनीतून काही युवकांनी कंपनीच्या कंपाऊंडच्या तारा तोडून आतमध्ये प्रवेश करून कंपनीतील पितळी धातूच्या वस्तूंची चोरी केल्याची घटना घडली. शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात युवकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

करंदी (ता. शिरूर)  इन्फीलूम इंडिया प्रायवेट लिमिटेड कंपनीमधील सुरक्षारक्षक ऑफिसर गणेश ठाकरे हे कंपनीमध्ये फिरत असताना कंपनीच्या कंपाऊंडच्या तारा तुटल्याचे त्यांना दिसले त्यामुळे ठाकरे यांनी कंपनीचे व्यवस्थापक राजेंद्र मोरे यांना माहिती देत कंपनीमध्ये बोलावून पाहणी केली. कंपनीतील पितळी धातूच्या काही वस्तू चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तसेच तीस हजार रुपये किमतीचे पितळी धातूचे सुमारे एकोणीस नोझल चोरीला गेल्याचे दिसून आले. याबाबत करंदी येथील इन्फीलूम इंडिया प्रायवेट लिमिटेड कंपनीचे व्यवस्थापक राजेंद्र गंगाराम मोरे (रा. ससाणेनगर हडपसर पुणे)  यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार आजिनाथ शिंदे हे करत आहे.