पंढरीत सोळा लाखांची चोरी; मात्र घरमालकास पत्ताच नाही

पंढरपूर :  शहरातील मध्यवस्तीत राहणाऱ्या मोठ्या व्यापार्‍याच्या घरी सुमारे पंधरा लाख ७५ हजार रुपयांची घरफोडी झाली. मात्र या व्यापाऱ्याला १५ दिवसापर्यंत घरात चोरी झाल्याचे लक्षात आले नाही. या प्रकरणाचा पोलीस शोध घेत असून शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहर पोलिस ठाण्यासमोरच असणार्‍या महावीर नगर येथील फर्निचरचे व्यापारी अजित ताराचंद फडे यांनी आपल्या घरातील सोन्याचे व चांदीचे दागिने एका साडीमध्ये बांधून टेबलाच्या खणात होते. अजित फडे हे आपली मुलगी मधुरिमा हिला पुणे येथे पोहोचवण्यासाठी दि. ९ डिसेंबर रोजी सपत्नीक गेले होते. दि. १३ डिसेंबर रोजी सायंकाळी पुण्याहून घरी परतल्यानंतर घरातील फ्रीज मध्ये ठेवलेला पाणी पिण्याचा चांदीचा मग घेण्यास गेले असता, त्यांना तो मिळाला नाही. त्यामुळे संशय आल्याने कपाटातील इतर साहित्य पाहिले असता, त्या ठिकाणी ठेवलेली चांदीची भांडी व दागिने गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. चोरट्यांनी हे दागिने सराईतपणे लंपास केले आहेत. या चोरीमध्ये सुमारे १२ लाख ६० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने, दोन लाख तीन हजार सातशे रुपयांचे चांदीचे दागिने, आणि वस्तूसह ५० हजार रुपये किंमत असलेला सोने व मोत्याच्या खंडेलवाल सेट, मोबाईल, रोख रक्कम ५० हजार रुपये असा एकूण १५ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेला आहे.याप्रकरणी अजित फडे यांच्या पत्नीने शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पुढील तपास पोलिस करीत आहेत.