….. तर बुलडोझर पुढं आडवा पडलो असतो; आंबील ओढा येथील अतिक्रमण कारवाई ऊर्जामंत्री व काँग्रेसचे नेते डॉ.नितीन राऊत यांची टीका

झोपड्पट्टीधारकांचे पुनर्वसन करायचे त्याला विरोध करण्याची गरज नाही.पण नाला विस्तारीकरण असेल किंवा इतर कामे ऐन पावसाळ्यात कधीच केली जात नाही. पुणे महानगरपालिकेकडून करण्यात आलेली आंबील ओढा येथील अतिक्रमण हटविण्याची कारवाईची घटना अत्यंत वेदनादायी आहे.

    पुणे: महानगरपालिकेकडून करण्यात आलेली आंबील ओढा येथील अतिक्रमण हटविण्याची कारवाईची घटना अत्यंत वेदनादायी आहे, त्याचा निषेध करतो. आंबिल ओढा अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईला पुणे महापालिकाच जबाबदार आहे. अशी कारवाई करताना महापालिकेला लाज वाटली पाहिजे. माझ्या नागपुरात जर अशी कारवाई झाली असती तर बुलडोझर पुढं आडवा पडलो असतो. मात्र. आंबील ओढा कारवाई सुरु असताना यावेळी महापौर काय झोपा काढत होते का? या घटनेची राज्य सरकारमार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी राज्याचे ऊर्जामंत्री व काँग्रेसचे नेते डॉ.नितीन राऊत यांनी केली आहे.

    झोपड्पट्टीधारकांचे पुनर्वसन करायचे त्याला विरोध करण्याची गरज नाही.पण नाला विस्तारीकरण असेल किंवा इतर कामे ऐन पावसाळ्यात कधीच केली जात नाही. पुणे महानगरपालिकेकडून करण्यात आलेली आंबील ओढा येथील अतिक्रमण हटविण्याची कारवाईची घटना अत्यंत वेदनादायी आहे, त्याचा निषेध करतो. कोरोना महामारी सुरू असताना आणि ऐन पावसाळ्यात अशा प्रकारच्या कारवाईमुळे येथे राहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांचे जीवनच उध्वस्त करण्यात आले. ही सर्व गरीब लोकं आहेत. फुले आणून हार, गजरे तयार करून विकण्याचा त्यांचा व्यवसाय आहे.गेले. असेही राऊत म्हणाले.

    पुण्यातील आंबील ओढा येथील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी डॉ. नितीन राऊत पुणे दौऱ्यावर आले होते. यानंतर त्यांनी काँग्रेसभवनात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी शहराध्यक्ष रमेश बागवे, प्रदेश उपाध्यक्ष व माजी आमदार मोहन जोशी, प्रदेश प्रवक्ता गोपाळ तिवारी, अभय छाजेड व अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.