थेरगाव – चिंचवड पुलाच्या विद्युत कामांसाठी ४६ लाखाचा खर्च ; दोन वर्षात होणार कामाची पूर्तता

महापालिका विद्युत विभागामार्फत थेरगाव येथे प्रसूनधाम शेजारी १८ मीटर विकास आराखड्यातील रस्त्यावर थेरगाव - चिंचवड दरम्यान पुल बांधण्यात येत आहे. या कामाअंतर्गत विद्युत विषयक कामे करण्यात येणार आहेत. या कामासाठी ६२ लाख २७ हजार रूपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे

    पिंपरी: थेरगाव – चिंचवड दरम्यान प्रसुनधाम शेजारी सुरू असलेल्या पुलाच्या बांधकामाअंतर्गत विद्युत विषयक कामे करण्यात येणार आहेत. या कामासाठी ४६ लाख ८६ हजार रूपये खर्च होणार आहे. महापालिका विद्युत विभागामार्फत थेरगाव येथे प्रसूनधाम शेजारी १८ मीटर विकास आराखड्यातील रस्त्यावर थेरगाव – चिंचवड दरम्यान पुल बांधण्यात येत आहे. या कामाअंतर्गत विद्युत विषयक कामे करण्यात येणार आहेत. या कामासाठी ६२ लाख २७ हजार रूपये खर्च अपेक्षित धरण्यात आला  . त्यानुसार, ठेकेदारांकडून निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्यामध्ये तीन ठेकेदारांनी निविदा सादर केल्या. त्यापैकी न्यु सोलर इलेक्ट्रीकल्स अ‍ॅण्ड इलेक्ट्रॉन्स यांनी निविदा दरापेक्षा २४.७५ टक्के कमी म्हणजेच ४६ लाख ८६ हजार रूपये दर सादर केला. इतर ठेकेदारांपेक्षा न्यु सोलर यांची निविदा लघुत्तम असल्याने महापालिका अतिरिक्त आयुक्त यांनी १३ मार्च २१ रोजी निविदा स्विकृत करण्यास मान्यता दिली. हे काम पूर्ण करण्यासाठी दोन वर्षाची मुदत देण्यात आली आहे.