हे सरकार तीन पक्षांचे , इतरांनी मीठाचा खडा टाकू नये:अजित पवार

बारामती येथील विद्या प्रतिष्ठान याठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार ‌यांनी पत्रकारांशी संवाद साधला. खा संजय राऊत यांनी गृहमंत्री अनिल देशमुख हे अपघाताने गृहमंत्री झाले असल्याचे एका लेखात म्हटले आहे .

    बारामती:हे सरकार तीन पक्षांचे आहे, कोणाला मंत्री करायचे,ते त्या त्या पक्षाचे नेते ठरवतात, सरकार व्यवस्थित चालले असताना इतरांनी मीठाचा खडा टाकू नये,असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना केले.

    बारामती येथील विद्या प्रतिष्ठान याठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार ‌यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
    खा संजय राऊत यांनी गृहमंत्री अनिल देशमुख हे अपघाताने गृहमंत्री झाले असल्याचे एका लेखात म्हटले आहे . यासंदर्भात पवार म्हणाले, आघाडी सरकार शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस या तीन पक्षांचे मिळून आहे.कोणाला मंत्री करायचे,हा निर्णय त्या त्या पक्षाचे प्रमुख घेत असतात, त्यामुळे व्यवस्थित चालले असताना इतरांनी मीठाचा खडा टाकू नये,असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी बोलताना मारला.