कोयता गँगमधील तिघांना अटक, हडपसर पोलिसांची कामगिरी

शहरातील मांजरी बुद्रुक परिसरात गुंडानी किरकोळ कारणावरून स्थानिक लोंकाना शिवीगाळ करुन दगडाने, बेल्टने मारहाण करुन जखमी केले होते. त्याशिवाय दुचाकीवरून पळुन जाताना कोयते हवेत फिरवत दहशत निर्माण केली होती. तपासादरम्यान मुख्य आरोपी समीर पठाण, शोएब पठाण, गणेश उर्फ दादा हवालदार हे गुन्हा दाखल झाल्यापासून फरार झाले होते.

    पुणे- हडपसरनजीक मांजरी भागात गुंडागर्दी करीत कोयते हवेत फिरवून दहशत माजविणाऱ्या आणखी तिघा आरोपीना हडपसर पोलिसांनी भिवंडी, आणि नगर परिसरातून अटक केली आहे. दरम्यान, संबंधित कोयता गॅंगच्या दहशतीचे पडसाद हिवाळी अधिवेशनात उमटले होते. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी गंभीर दखल घेत टोळीतील तिघांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

    समिर लियाकत पठाण वय 26 रा. गोपाळपट्टी मांजरी पुणे , शोएब लियाकत पठाण वय 22 रा. गोपाळपट्टी मांजरी पुणे आणि गणेश ऊर्फ दादा विठ्ठल हवालदार वय 22 रा. महादेवनगर हडपसर यांना अटक केली आहे.

    शहरातील मांजरी बुद्रुक परिसरात गुंडानी किरकोळ कारणावरून स्थानिक लोंकाना शिवीगाळ करुन दगडाने, बेल्टने मारहाण करुन जखमी केले होते. त्याशिवाय दुचाकीवरून पळुन जाताना कोयते हवेत फिरवत दहशत निर्माण केली होती. तपासादरम्यान मुख्य आरोपी समीर पठाण, शोएब पठाण, गणेश उर्फ दादा हवालदार हे गुन्हा दाखल झाल्यापासून फरार झाले होते.त्यांनी राहण्याचे ठिकाण बदलले होते. आरोपी भोर, सांगली, कोल्हापूर, बारामती असे वेगवेगळ्या ठिकाणी फिरत असल्याची तांत्रिक पोलिसांना मिळाली .

    आरोपी गणेश उर्फ दादा हवालदार हा कामठघर, भिवंडी जिल्हा ठाणे येथे असल्याबाबत तांत्रिक माहिती प्राप्त झाल्याने तपास पथकाचे पोलीस अंमलदार समीर पांडुळे, निखील पवार, प्रशांत दुधाळ यांच्या टीमने त्याला २३ डिसेंबरला पहाटेच्या वेळेस ताब्यात घेतले. तर पोलीस उपनिरीक्षक अविनाश शिंदे, पोलीस अंमलदार शाहीद शेख, प्रशांत टोणपे, अतुल पंधरकर यांच्या तपास टिमने दातरंगे मळा, नालेगाव जिल्हा नगर याठिकाणी कारवाई करून आरोपी आरोपी समिर पठाण व शोएब पठाण यांना ताब्यात घेतले. याप्रकरणी हडपसर पोलीसांनी गुन्ह्रामध्ये आतापर्यंत १० जणांना अटक केली आहे. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळ उपनिरीक्षक अविनाश शिंदे, सुशिल लोणकर, संदीप राठोड, सचिन जाधव, समिर पांडुळे, शाहीद शेख, निखील पवार, प्रशात दुधाळ, प्रशांत टोणपे, अतुल पंधरकर, सचिन गोरखे, भगवान हंबर्डे, अनिरूध्द सोनवणे यांनी केली.