बेकायदा पिस्तुल बाळगणारे तिघे जेरबंद; चार काडतुसे जप्त

योगेश शिवाजी दाभाडे (वय २२), निलेश पुंडलिक चव्हाण (वय २१), जगदीश बाळू शेळके (वय २१, तिघे रा. भोसरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस कर्मचारी सागर भोसले यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी हे विक्रीसाठी बेकायदेशीर शस्त्र बाळगत असल्याची माहिती मिळाली

    पिंपरी :  बेकायदेशीरपणे पिस्तुल बाळगल्याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून ३४ हजार रुपये किमतीचे एक पिस्तुल, चार काडतुसे तसेच एक मॅग्झिन जप्त करण्यात आले. ही कारवाई रविवारी (दि. २०) दुपारी साडेतीनच्या सुमारास भोसरी येथील गावजत्रा मैदान येथे करण्यात आली.

    योगेश शिवाजी दाभाडे (वय २२), निलेश पुंडलिक चव्हाण (वय २१), जगदीश बाळू शेळके (वय २१, तिघे रा. भोसरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस कर्मचारी सागर भोसले यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी हे विक्रीसाठी बेकायदेशीर शस्त्र बाळगत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, भोसरी पोलिसांनी कारवाई करून आरोपींना पकडले. त्यांच्याकडून एक पिस्तुल, चार काडतुसे तसेच एक मॅग्झिन असा ३४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. भोसरी पोलीस तपास करत आहेत.