accident
accident

दुसरा अपघात हा नवले ब्रिज परिसरात झाला आहे. अपघातात विजय रंगनाथ कुलकर्णी (वय ७०) यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात अज्ञात ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सचिन कुलकर्णी यांनी तक्रार दिली आहे. सचिन यांचे वडिल विजय हे दुचाकीवरून सकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास त्यावेळी अण्णा वडेवाले हॉटेल समोर आल्यानंतर पाठिमागून आलेल्या बोअरवेल मशीन ट्रकने त्यांना जोराची धडक दिली.

    पुणे : शहरात झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. ढोले पाटील रस्त्यावर दुचाकीस्वाराने पादचाऱ्याला उडविले. तर, नवले ब्रिजजवळ ट्रकने दुचाकीला ठोकले असून, तिसऱ्या घटनेत शिवणे येथे रस्ता ओंलाडणाऱ्या ज्येष्ठाला रिक्षाने धडक दिली.

    याप्रकरणी कोरेगांव पार्क पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकी चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या अपघातात नंदकुमार गणपत ढावरे (वय ३८, रा. मंगळवार पेठ) असे मृत्यू झालेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. याबाबत त्यांची बहिण सुनिता ढावरे (वय ५०) यांनी तक्रार दिली आहे. ५ जानेवारी दुपारी घडली आहे.

    ढोले पाटील रस्त्यावरून पायी चालत जात होते. ते धर्मादाय आयुक्त कार्यालयासमोर आल्यानंतर पाठिमागून आलेल्या भरधाव दुचाकी चालकाने त्यांना जोरात धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतु, उपचार सुरू असताना त्यांचा सोमवारी (दि. १० जानेवारी) मृत्यू झाला. त्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास महिला सहाय्यक निरीक्षक प्रेरणा कुलकर्णी या करत आहेत.

    तर, दुसरा अपघात हा नवले ब्रिज परिसरात झाला आहे. अपघातात विजय रंगनाथ कुलकर्णी (वय ७०) यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात अज्ञात ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सचिन कुलकर्णी यांनी तक्रार दिली आहे. सचिन यांचे वडिल विजय हे दुचाकीवरून सकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास त्यावेळी अण्णा वडेवाले हॉटेल समोर आल्यानंतर पाठिमागून आलेल्या बोअरवेल मशीन ट्रकने त्यांना जोराची धडक दिली. यात त्यांचा मृत्यू झाला आहे. अधिक तपास सिंहगड रोड पोलीस करत आहेत.

    तिसरा अपघात शिवणे येथे झाला असून, रस्ता ओलांडणाऱ्या ज्येष्ठाला भरधाव रिक्षाने धडक दिली. या अपघातात सुंदरराव वाघोबा कोकडवार (७५) असे मृत्यू झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. याबाबत उत्तमनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.