रिक्षा चालक अन पोलिसांमध्ये भररस्त्यात थरार; फिल्मी स्टाईल रिक्षा चालकाने कर्मचाऱ्याच्या अंगावर रिक्षा घालून चालक पसार, कर्मचारी गंभीर जखमी

तक्रारदार गणेश व दीपक राजमाने हे विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात नेमणुकीस आहेत. दरम्यान मंगळवारी सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास एक मुलगा ठाण्यात पळत आला. तसेच त्याने आमच्या सोसायटीच्या समोर एक रिक्षा गेली दोन दिवस उभा असून, ती रिक्षा आता कोणी यरी घेऊन जात आहे. तुम्ही चला असे म्हणाला.

    पुणे : पुण्यातील धानोरीत रिक्षा चालक व पोलीसांमध्ये भररस्त्यात थरार घडला आहे. पाठलाग करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या अंगावर रिक्षा घालत दुचाकीला धडक देऊन रिक्षा चालक पसार झाला. काही मिनिटं चाललेल्या या थराराने मात्र नागरिकांच्या अंगाचा थरकाप उडवला आहे. कर्मचारी जखमी झाला असून, खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

    पोलीस शिपाई दीपक राजमाने (वय ४५) असे जखमी झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. राजमाने यांच्यावर एका मोठ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी रिक्षा चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस शिपाई गणेश शिरसाठ यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार गणेश व दीपक राजमाने हे विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात नेमणुकीस आहेत. दरम्यान मंगळवारी सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास एक मुलगा ठाण्यात पळत आला. तसेच त्याने आमच्या सोसायटीच्या समोर एक रिक्षा गेली दोन दिवस उभा असून, ती रिक्षा आता कोणी यरी घेऊन जात आहे. तुम्ही चला असे म्हणाला. यामुळे दीपक राजमाने व गणेश शिरसाठ यांनी धाव घेतली. त्यावेळी रिक्षा चालक रिक्षा घेऊन निघाला होता. पण, त्यांनी त्याला थांबवत चौकशी केली. तर त्याने बोलत बोलत रिक्षा तशीच दामटत पळून गेला. मग गणेश यांनी त्याचा पाठलाग सुरू केला. पण, त्याने सुसाट रिक्षा पळवली. त्यावेळी दीपक राजमाने यांनी एका वाहन चालकाची मदत घेतत्याच्या दुचाकीवरून रिक्षाच्या पुढे जात रस्त्यावर उभा राहून रिक्षा थांबवण्यास सांगितले. पण, त्याने दीपक यांच्या अंगावर रिक्षा घालत पळून तरीही दीपक यांनी रिक्षाच्या बारला धरुन रिक्षा थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने रिक्षा अडचणीत दामटत दीपक यांना खाली पाडले आणि त्यांना गंभीर जखमी केले आहे. यात दीपक हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या मणक्याला जबर मार लागला आहे. इतके करूनही रिक्षा चालक पसार होण्यात यशस्वी झाला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.