rape

शिरूर शहरातील खळबळजक घटना
शिक्रापूर: स्वताच्या पोटच्या अल्पवयीन मुलीचा मुलीची आई आणि आईच्या प्रियकराने मदतीने जबरदस्तीने मोबाईलमध्ये अश्लील व्हिडीओ दाखवत अल्पवयीन मुलीशी अश्लील वर्तन करत विनयभंग केल्या धक्कादायक प्रकार शिरुर परिसरात घडला असून शिरूर पोलीस स्टेशन येथे पीडित मुलीची आई व तिच्या प्रियकरावर गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे.
शिरूर (ता. शिरूर) येथील पीडित मुलीची आई तिचा प्रियकर विजय पाटील या प्रियकराला नेहमी घरात घेत असून दोघे देखील घरात दारू पिऊन अश्लील कृत्य करत, यावेळी विजय पाटील हा पीडितेला मोबाईलमध्ये अश्लील व्हिडिओ दाखवत तुझी आई व मी जे करतो ते माझे सोबत कर तुला मजा येईल असे म्हणून मुलीच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करत असे याबाबत मुलगी प्रतिसाद देत नसल्याने याबाबत कोणाला काही सांगितले तर तुला मारून टाकीन अशी धमकी देखील देत असे तर पीडितेची आई हि मुलीला तिचा प्रियकर विजय पाटील हे तुझे वडील आहेत त्यांना तू पप्पा म्हणत जा आणि ते तुला जसे म्हणतात तू तसे करत असे सांगत असे. याबाबत आई व आईच्या प्रियकराकडून होणारे अत्याचार असह्य होऊ लागल्याने पिडीतेने तिच्या आत्याला याबाबत सर्व हकीगत सांगितली, याबाबत पिडीत मुलीच्या आत्याने शिरूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिरूर पोलिसांनी पिडीत अल्पवयीन युवतीची आई व तिचा प्रियकर विजय अर्जुन पाटील रा. खारमळा शिरूर (ता. शिरूर) यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करत दोघांना देखील अटक केली. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रविन खानापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक गणेश जगदाळे हे करत आहे.